मुक्तपीठ टीम
सांगलीत सुरू झालेल्या देशातील पहिल्या वेश्या साक्षर शाळेची कीर्ती आता साता समुद्रापार पोहचणार आहे. सुंदरनगरच्या प्रनेत्या स्व. अमिराबी शेख बंदव्वा यांच्या आशीर्वादाने पत्रकार दीपक चव्हाण यांनी सुरू केलेल्या वेश्या साक्षर शाळेचा उपक्रम जगभरात लोकप्रिय असणाऱ्या जर्मन टीव्हीच्या माध्यमातून संपूर्ण जगभरात महिला दिनी प्रसारित होणार आहे. याचे दोन दिवसाचे चित्रीकरण करण्यासाठी खास जर्मनीहून आलेल्या अलविरा या जर्मन टीव्ही रिपोर्टरने वेश्या साक्षर शाळेचे चित्रीकरण केले तसेच येथील वारांगना आणि देवदासी महिलांच्या व्यथा अडचणी समजून घेतल्या.
जगातील ५० हून अधिक देशांमध्ये दीपक चव्हाण यांची ही शाळा पोहचणार आहे. आज चित्रिकरण सुरू असताना स्थानिक नगरसेविका अनारकली कुरणे यांनीही या वारांगना महिलांना इंग्रजी वर्णमालेचे शिक्षण दिले. या शाळेत जर्मन रिपोर्टर अलविरा हेही हातात पाटी घेऊन सहभागी झाले होते. पत्रकार दीपक चव्हाणांच्या या उपक्रमाने ते चांगलेच भारावून गेले. या सुंदरनगरची कथा आणि व्यथा आपल्या जर्मन टीव्हीच्या माध्यमातून जगभर पोहचवणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पाहा व्हिडीओ: