Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोचे ४,१५८ सदनिकांसह वाणिज्यिक गाळे, कार्यालये आणि भूखंड विक्रीसाठी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
cidco

मुक्तपीठ टीम

समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या उन्नतीसाठी ‘सर्वांसाठी घरे’ मिशन अंतर्गत समान संधी निर्माण करण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली PMAY योजनेअंतर्गत परवडणारी घरे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी सिडको महामंडळातर्फे, गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सिडकोच्या विविध गृहसंकुलांतील उपलब्ध ४ हजार १५८ घरांसोबतच २४५ वाणिज्यिक गाळे, रेल्वे स्थानक संकुलांतील ६ कार्यालये व त्याचप्रमाणे विविध वापरांसाठी भूखंड विक्रीच्या योजना सादर करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील विविध घटकांचा गणेशोत्सवाचा आनंद निश्चितच द्विगुणीत होणार आहे.

डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक यांच्या नेतृत्वाखाली, सिडको सातत्याने घरे, भूखंड, दुकाने आणि कार्यालयांची (कमर्शियल प्रीमाईसेस) विविध योजनांद्वारे समाजातील सर्व घटकांना विक्री करते. ज्यामुळे शहराच्या आर्थिक विकासात मदत होण्यासोबतच नवी मुंबईच्या वाणिज्यिक क्षमता वृद्धिंगत होऊन शहराच्या आर्थिक विकासासही हातभार लागतो.

नागरिकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देताना या योजनांची घोषणा करून डॉ. संजय मुखर्जी यांनी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शहर असलेल्या नवी मुंबईत नागरिक, व्यापारी आणि विकासक यांना त्यांची घरे, कार्यालये, व्यावसायिक गाळ्यांची मालकी मिळण्याचा मार्ग मोकळा केला आहे. महागृहनिर्माण योजने अंतर्गत नवी मुंबईतील द्रोणागिरी, कळंबोली, तळोजा आणि खारघर नोडमधील सिडकोच्या गृहसंकुलांतील 4,158 घरे विक्रीकरिता उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. परवडणाऱ्या दरातील या ४ हजार १५८ घरांपैकी ४०४ घरे ही प्रधानमंत्री आवास योजनेंतर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकाकरिता आणि उर्वरित ३ हजार ७५४ घरे ही सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेसाठी नवीन उत्पन्न मर्यादा ६ लाख रूपये तर अनुदानाची रक्कम २ लाख ५० हजार रूपये निश्चित करण्यात आली आहे. नवी मुंबईतील विकसित नोडमध्ये आणि मोक्याच्या ठिकाणी सदर घरे असलेली गृहसंकुले वसलेली आहेत. या गृहसंकुलांना रस्ते, रेल्वे आणि सिडकोच्या मेट्रोद्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभलेली आहे. आधुनिक सोयी सुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या या गृहसंकुलांच्या परिसरात शाळा, महाविद्यालये, रुग्णालये इ. सर्व सामाजिक सुविधाही उपलब्ध आहेत.

इतर योजनांतर्गत सिडकोच्या खारघर, तळोजा, द्रोणागिरी, कळंबोली, खारघर आणि घणसोली गृहसंकुलातील एकूण २४५ वाणिज्यिक गाळे विक्रीकरिता उपलब्ध आहेत. तसेच नेरूळ रेल्वे स्थानक संकुल आणि जुईनगर स्थानक संकुल येथील प्रत्येकी ३ याप्रमाणे एकूण ६ कार्यालये (कमर्शिअल प्रीमाईसेस) विक्रीकरिता उपलब्ध आहेत. त्याचबरोबर तारांकीत हॉटेलसाठी १, निवासी वापरासाठी ६४ तर निवासी तथा वाणिज्यिक वापरासाठी ५ भूखंड विक्रीकरीता उपलब्ध आहेत. उपरोक्त योजनांच्या सविस्तर माहितीकरिता https://www.cidco.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ उपलब्ध करून देण्यात आले असून अर्ज नोंदणीपासून ते सोडती पर्यंतच्या सर्व प्रक्रिया या पारदर्शक अशा ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पार पडणार आहेत. योजनांसंबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता
अर्जदारांनी या संकेतस्थळास भेट द्यावी.

पाहा:


Tags: Chief Minister Eknath ShindeCIDCODeputy Chief Minister Devendra FadnavisFlat salegood newsmuktpeethPlot salePradhan Mantri Awas Yojanaउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसगाळे आणि कार्यालय विक्रीघडलं-बिघडलंचांगली बातमीप्रधानमंत्री आवास योजनाभूखंड विक्रीमुक्तपीठमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसदनिका विक्रीसिडको
Previous Post

पुणे महानगरपालिकेत ‘योगशिक्षक’ पदावर ५४ जागांसाठी करिअर संधी

Next Post

सोनाली फोगाट मृत्यूकांड : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हरियाणा सरकारला चौकशी अहवाल सादर

Next Post
Sonali Phogat Death Case

सोनाली फोगाट मृत्यूकांड : गोव्याच्या मुख्यमंत्र्यांकडून हरियाणा सरकारला चौकशी अहवाल सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!