मुक्तपीठ टीम
शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यानंतर शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरु झालं आहे. आजही मातोश्रीवर महत्वाच्या स्थानिक नेत्यांचे पक्षप्रवेश झालेत. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे देखील शिंदे गटात सामील झाले होते. त्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र, संतोष बांगर यांना टक्कर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता व्यूहरचना रचली आहे. कळमनुरीचे माजी आमदार संतोष टार्फे आणि शेतकरी नेते अजित मगर यांनी उद्धव ठाकरेंच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. पण आजच्या प्रवेशात महत्वाचं नाव होतं ते उद्धव कदम यांचं. ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कोकण प्रांतात काम करतात. त्यांच्या प्रवेशामुळे आता संघ परिवारातूनही शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
अनेक जिल्ह्यांमधून शिवसेनेत प्रवेश-अरविंद सावंत
- एकीकडे मातोश्रीवर रीघ लागली आहे.
- अनेक जिल्ह्यांमधून प्रवेश येत आहेत.
- हिंगोली जिल्ह्यातून काही नेते पुन्हा आमच्याकडे आले आहेत.
- यात संतोष टार्फे, अजित मगर, सुभाष वानखेडे, थोरात, पुरी आणि बजरंग दलाचा समावेश आहे.
कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांनी ऐनवेळी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. मात्र, आता उद्धव ठाकरे संतोष बांगर यांच्यासमोर कडवं आव्हान निर्माण करत आहेत.सोमवारी डॉ.टार्फे आणि अजित मगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. नवनिर्वाचित असलेले सहसंपर्कप्रमुख बबनराव थोरात व माजी खासदार सुभाष वानखेडे यांनी देखील पक्षात प्रवेश केला आहे.
संघ परिवारातून शिवसेनेत!
- उद्धव कदम यांनी प्रवेशामागील कारण मांडलं.
- मी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचं कोकण प्रांतात काम करतो.
- शिवसेना हिंदुत्वाच्या आणि संयुक्त महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मंदिराचा गाभा आहे.
- शिवसेनेचं महत्त्व आणि महात्म्य टिकून राहिलं पाहिजे.
- कारण मुंबई टिकली तर महाराष्ट्र टिकेल. महाराष्ट्र टिकला तर महाराष्ट्राची अस्मिता टिकेल.
- आतापर्यंत आम्ही संघ बंधनात काम करत होतो, आता छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या शिवबंधनात काम करण्यास आलो आहोत.