मुक्तपीठ टीम
अफगाणिस्तानातील काबुलमध्ये लपून बसलेल्या अल कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीला ठार करणारे अमेरिकेचे ड्रोन लवकरच भारतही घेणार आहे. अमेरिकेकडून हे ड्रोन खरेदी करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. चीन लगतची सीमा आणि हिंद महासागरातील आपली सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्यासाठी भारत ३ अब्ज डॉलर्सच्या किंमतीत ३० MQ-9B प्रीडेटर सशस्त्र ड्रोन अमेरिकेकडून खरेदी करणार आहे.
हे ड्रोन तीन सशस्त्र दलांसाठी म्हणजेच लष्कर, हवाई दल आणि नौदलासाठी खरेदी करण्यात येत आहे. हे ड्रोन सागरी दक्षता, पाणबुडीवर हल्ला, हवेतून मारा करणे आणि जमिनीवरील लक्ष्यांसह विविध लक्ष्य साध्य करण्यास सक्षम असेल.
अल-जवाहिरीला मारलेल्या MQ-9B ड्रोनच्या मदतीने भारत पाळत ठेवणार!!
- अल-जवाहिरीला मारण्यासाठी वापरण्यात आलेला MQ-9B ड्रोन हा MQ-9 ‘रीपर’ चा एक प्रकार आहे, ज्याचा उपयोग हेलफायर क्षेपणास्त्राच्या सुधारित व्हर्जनसाठी केला गेला होता.
- या ड्रोनद्वारे गेल्या महिन्यात काबुलमध्ये अल-कायदाचा म्होरक्या अयमान अल-जवाहिरीचा खात्मा केला होता.
- जनरल अॅटॉमिक्स ग्लोबल कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी डॉ विवेक लाल यांनी सांगितले की, “दोन्ही सरकारांमधील खरेदी कार्यक्रमाबाबतची चर्चा अंतिम टप्प्यात आहे.
MQ-9B ड्रोनची काय आहे आधुनिकता?
- MQ-9B ड्रोनमध्ये चार हेलफायर क्षेपणास्त्रे आणि ४५० किलो बॉम्ब वाहून नेण्याची क्षमता आहे.
- पाळत ठेवणे, गुप्तचर माहिती गोळा करणे आणि शत्रूची जागा नष्ट करणे यासह अनेक कारणांसाठी तैनात केले जाऊ शकते.
- स्काय गार्डियन आणि सी गार्डियन हे MQ-9B चे दोन प्रकार आहेत.