मुक्तपीठ टीम
उद्योजक एलॉन मस्क आणि ट्विटरमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू आहे. ते एका करारावरून एकमेकांवर आरोप करत आहेत. मायक्रो-ब्लॉगिंग साइट ट्विटर आणि टेस्लाचे मालक एलॉन मस्क यांच्यात एप्रिलपासून सुरू असलेला करार आता न्यायालयात गेला आहे. बनावट अकाउंटबाबत अचूक माहिती न दिल्याचा आरोप करत मस्कने ट्विटरला ४४ अब्ज डॉलर्समध्ये विकत घेण्याचा करार रद्द केला होता. एकीकडे हा वाद सुरु असताना आता आता ट्विटरचे सुरक्षा विभागाचे माजी प्रमुख पीटर जॅटको यांनी एक गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी ट्विटरवर नियामकांची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. तसेच भारतात सरकारच्या एजंटला कंपनीच्या खर्चाने ठेवण्याची परवानगी दिल्याचा आरोप केला आहे.
पीटर जॅटकोचा हादरवणारा गौप्यस्फोट
- ट्विटरचे माजी सुरक्षा प्रमुख पीटर जॅटको यांनी अमेरिका अधिकाऱ्यांकडे व्हिसलब्लोअर म्हणून तक्रार दाखल केली आहे आणि आरोप केला आहे की कंपनीने सायबर सुरक्षा आणि बनावट अकाउंटशी संबंधित समस्यांबद्दल नियामकांची दिशाभूल केली आहे.
- जॅटकोने दाखल केलेल्या तक्रारींमध्ये असा आरोप करण्यात आला आहे की, ट्विटरने मुद्दामून भारत सरकारला कंपनीच्या खर्चावर त्यांच्या एजंटना ठेवण्याची परवानगी दिली होती.
- जिथे त्यांना कंपनीच्या सिस्टम आणि यूजर्सच्या डेटावर थेट प्रवेश होता.
एलॉन मस्कने करार रद्द करण्याचे कारण म्हणजे, बनावट अकाउंट पाच टक्क्यांपेक्षा कमी आहेत असा ट्विटरने दावा केला तर, मस्क म्हणतात की, २० टक्के बनावट आणि स्पॅम खाती, जी ट्विटरच्या दाव्याच्या चार पट जास्त असू शकतात. यावरून दोघांमध्ये वाद सुरू आहे.
राहुल गांधी यांचेही केंद्र सरकारवर गंभीर आरोप
प्रसारमाध्यमांमधील बातम्यांचा संदर्भ देत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की हेरगिरी, धमकी आणि चोरी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उल्लेख केलेल्या ‘अमृतकाल’चा आधार आहेत. ट्विटरच्या सुरक्षा प्रकरणांचे माजी प्रमुख पीटर जॅटको यांच्याशी संबंधित बातम्यांना टॅग करत राहुल गांधी यांनी ट्विट केले की, “पंतप्रधानांच्या वचनाचे अमृत हे हेरगिरी, धमकावणे आणि चोरीवर आधारित आहे.