मुक्तपीठ टीम
१५व्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र (IOAA) ऑलिम्पियाडमध्ये भारताने पदकतालिकेत तिसरा क्रमांक मिळवला. तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदके जिंकून भारताने सिंगापूरसह संयुक्तपणे तिसरे स्थान पटकावले. १४ ते २१ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जॉर्जियामधील कुटैसी येथे १५वे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड २०२२ आयोजित करण्यात आले होते.
वैयक्तिक कामगिरीचे तपशील खालीलप्रमाणे:
वैयक्तिक कामगिरीचे तपशील खालीलप्रमाणे:
# | स्पर्धकाचे नाव | मिळवलेले पदक | ठिकाण |
1 | राघव गोयल | सुवर्ण | चंदीगड |
2 | साहिल अख्तर | सुवर्ण | कोलकाता |
3 | मेहुल बोराड | सुवर्ण | हैदराबाद |
4 | मलय केडिया | रौप्य | गाझियाबाद |
5 | अथर्व निलेश महाजन | रौप्य | इंदूर |
या संघाचे नेतृत्व केलेले दोघे: प्रा. सरिता विग (भारतीय अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान संस्था, तिरुवनंतपुरम), प्रा. अजित मोहन श्रीवास्तव (इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स, भुवनेश्वर) , आणि दोन वैज्ञानिक निरीक्षक: डॉ. श्रीहर्ष तेंडुलकर (टाटा मूलभूत संशोधन संस्था, मुंबई) आणि तेजस शाह (फादर एग्नेल मल्टीपर्पज स्कूल आणि ज्यु. कॉलेज, नवी मुंबई). डॉ. तेंडुलकर हे स्वतः २००२ आणि २००३ (एकूण अव्वल) चे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र ऑलिम्पियाडमधले सुवर्णपदक विजेते मध्ये होते. या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये ३७ मुख्य आणि ६अतिथी संघातील असे २०९ विद्यार्थी सहभागी झाले होते. याव्यतिरिक्त, ६ देशांतील २४ विद्यार्थी ऑनलाइन सहभागी झाले होते. यंदाची स्पर्धा मुळात युक्रेनमधील कीव येथे होणार होती; मात्र युक्रेनमधील युद्धामुळे मार्च २०२२ मध्ये जॉर्जियातील कुताईसी येथे भरवण्याचे ठरले.
पदकतालिकेत भारत सिंगापूरसह संयुक्तपणे तिसर्या क्रमांकावर आहे, इराणचा अधिकृत संघ (५ सुवर्ण) आणि पाहुणा संघ (४ सुवर्ण, १ रौप्य) दुसऱ्या स्थानावर आहे. या आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये एकूण २८ सुवर्ण, ३८रौप्य आणि ५५ कांस्य पदके वितरित करण्यात आली. सर्वात आव्हानात्मक सैद्धांतिक प्रश्नाच्या सर्वोत्तम निराकरणासाठी राघव गोयल यांनी विशेष पारितोषिक जिंकले.