मुक्तपीठ टीम
महानायक अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केले आहे. अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याआधी बच्चन यांना २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती.
T 4388 – I have just tested CoViD + positive .. all those that have been in my vicinity and around me, please get yourself checked and tested also .. 🙏
— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 23, 2022
अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण!!
- सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती १४’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.
- या शूटिंगदरम्यान सेटवर कोरोना नियमांचं पूर्णपणे पालन केलं जात आहे.
- मात्र, तरी देखील त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
- अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करून याची माहिती दिली आहे.
- अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केले की, मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना मी विनंती करतो की त्यांनी त्वरित कोरोनाची चाचणी करावी.
बच्चन यांना यापूर्वी जुलै २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांनाही कोरोना झाला होता. अमिताभ बच्चन याना कोरोनाची लागण झाल्याने, त्यांच्या कौन बनेगा करोडपती शोचे शूटिंग काही दिवसांसाठी थांबवले जाऊ शकते. अमिताभ यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं कळताच त्यांचे चाहते आणि अनेक बॉलिवूड स्टार्स ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्राथर्ना करत आहेत.
मुंबई कोरोनाचा पुन्हा एकदा फैलाव!!
- मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा डोकं काढायला सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ८३२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
- मुंबईत एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ६ हजार २६९ इतकी आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यायला पाहिजे.
#CoronavirusUpdates
२३ ऑगस्ट, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्णौ- ८३२
२४ तासात बरे झालेले रुग्ण- ३३०
बरे झालेले एकूण – १११३८२९
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७.७%एकूण सक्रिय रुग्ण- ६२६९
दुप्पटीचा दर- ९७० दिवस
कोविड वाढीचा दर ( १६ ऑगस्ट – २२ ऑगस्ट )-०.०७०%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 23, 2022