मुक्तपीठ टीम
आम आदमी पार्टीने आता महाराष्ट्रावरही लक्ष केंद्रीत केले आहे. पक्ष वाढवण्यासाठी सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना आपल्या पक्षात घेण्यासाठी आपने प्रयत्न सुरु केले आहेत. काही मान्यवर देशातील सध्याच्या परिस्थितीला कंटाळूनही एक पर्याय म्हणून स्वत:आपकडे वळत आहेत, असा दावा पक्षाकडून केला जात आहे. महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ ओबीसी नेते माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी आपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत वंचितचे नेते माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी आणि यवतमाळचे अमानभाई यांनीही आपचा झाडू हाती घेतला आहे.
आपच्या महाराष्ट्र विभागाच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, राज्यातील जनता वाढती महागाई, भ्रष्टाचार, सीबीआय, ई डी, या केंद्रीय गुप्तचर यंत्रणांचा गैरवापर, प्रस्थापितांच्या फोडा फोडीचे राजकारण या सर्व बाबींना कंटाळली असून सक्षम राजकीय पर्याय म्हणून राज्यातील जनता आम पार्टी कडे बघत आहे, असा दावा आपने केला आहे.
जनतेचे अनेक महत्वाचे प्रश्न प्रलंबित असताना प्रस्थापित पक्ष मात्र एकमेकावर चिखलफेक करण्यात व्यस्त आहेत, महाराष्ट्रात मराठा, ओबीसी,मागासवर्गीयांचे बढती मधील आरक्षणासारखे विषय मार्गी लावण्यात सरकार असफल ठरले आहे , या परिस्थितीत अशातच “आप”चे दिल्ली व पंजाब मॉडेल आकर्षणाचे ठरले आहे. दिल्ली सरकारचा शिक्षणाचा दर्जा, आरोग्य, मोफत वीज, महिलांची पेन्शन योजना, सुशिक्षित बेरोजगारांना दर महा. भत्ता, या योजना बाबत सर्व देशभर चर्चा व कौतुक होत आहे येणाऱ्या काळात पंचायत समिती ,जिल्हा परिषद ,नगरपालिका, महानगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पक्ष सर्व ताकतीने लढविणार आहे, असेही आपने जाहीर केले आहे.
आपच्या पत्रकानुसार, प्रस्थापित पक्षाबद्दल लोकांमध्ये राग असून जनतेला सक्षम राजकीय पक्षाचा पर्याय देण्याकरिता येणाऱ्या काळात राज्यातील अनेक बहुजन तसेच ओबीसी नेते, कार्यकर्ते आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत त्याची सुरुवात राष्ट्रीय ओबीसी नेते तथा माजी खासदार हरिभाऊ राठोड यांच्यासह रिटायर्ड ए.सि.पी.धनराज वंजारी तसेच यवतमाळचे व्हाईट टायगर अमान भाई यांचा जाहीर प्रवेश दिल्ली येथे आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंदजी केजरीवाल यांच्या हस्ते झाला.
याप्रसंगी महाराष्ट्र प्रभारी दिपक सिंगल,मुंबई प्रभारी अंकूश नारंग मुंबई प्रदेश अध्यक्षा प्रीती मेनन, महाराष्ट्र प्रदेश सचिव धनजय शिंदे,महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री विजय कुंभार पुणे ओबीसी मुस्लिम संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर भाई अन्सारी ऑल इंडिया बंजारा संघाचे उत्तर भारताचे अध्यक्ष एस पी सिंग लबाना तसेच हरियाणा प्रदेशचे आम आदमी पार्टीचे नेते मखनसिंग लबाना या प्रसंगी उपस्थित होते.
अनेक नेत्यासह शेकडो कार्यकर्ते यांनी जाहीर प्रवेश केला. आम् आदमी पार्टीचे ध्येय धोरण तळगळातील शेवटच्या घटका पर्यंत पोहचिण्यासाठी आम्ही प्रयत्न करु,२०२४ मध्ये अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वखाली या देशाला नवीन सक्षम पर्याय मिळणार असून नवीन क्रांती घडणार असल्याचा विश्वास माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी यावेळेस व्यक्त केला.