मुक्तपीठ टीम
विद्यापीठ अनुदान आयोग म्हणजेच यूजीसीने शैक्षणिक सत्र २०२२-२३ च्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर केल्या आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवार नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर अर्ज करून या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात.
यूजीसी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती अंतर्गत, मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात प्रवेश घेतलेल्या आणि त्यांच्या पालकांचे एकुलते एक अपत्य असलेल्या मुलींना आर्थिक सहाय्य दिले जाईल. . या शिष्यवृत्तीमध्ये मागास-गरीब कुटुंबांना महत्त्व दिले जाणार आहे. यूजीसी पीजी इंदिरा गांधी शिष्यवृत्ती अंतर्गत, निवडलेल्या विद्यार्थिनींना प्रति वर्ष ३६ हजार २०० रुपये दिले जातील. या शिष्यवृत्तीसाठी मुली ३१ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
युनिव्हर्सिटी रँक धारकांसाठी यूजीसी पीजी शिष्यवृत्ती
- मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेल्या, तसेच पहिली किंवा दुसरी रँक मिळवलेल्या आणि कोणत्याही पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्समध्ये प्रवेश घेतलेल्या अशा विद्यार्थ्यांना यूजीसी पीजी शिष्यवृत्ती दिली जाईल.
- या शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झाल्यानंतर, उमेदवारांना दरमहा ३१ हजार रुपये दिले जातील.
- शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.
अनुसूचित जाती, अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी यूजीसी पीजी शिष्यवृत्ती
- ही शिष्यवृत्ती अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील अशा विद्यार्थ्यांना दिली जाईल, जे यूजीसीद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रम करत आहेत.
- शिष्यवृत्ती अंतर्गत निवड झाल्यानंतर, मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी केलेल्या विद्यार्थ्यांना ७ हजार ८०० प्रति महिना, तर इतर अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांना ४ हजार ५०० प्रति महिना दिले जातील.
- या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर २०२२ आहे.
या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी, विद्यार्थी राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टल www.scholarships.gov.in या वेबसाइटला भेट देऊन नोंदणी करू शकतात.