Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईत पुन्हा कोरोना वाढतोय…दैनंदिन रुग्णसंख्येत १० दिवसांमध्ये तिप्पट वाढ!

August 19, 2022
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona

मुक्तपीठ टीम

गेल्या काही दिवसांपासून मुंबईमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. गुरुवारी मुंबईत १ हजार २०१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. ३० जूननंतर एका दिवसात नोंद झालेल्या नवीन प्रकरणांची ही सर्वाधिक संख्या आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत १० दिवसांमध्ये तिप्पट वाढ झाली आहे.

गुरुवारी कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. मुंबईत मागील २४ तासांत ६८१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत सध्या उत्साहाचं वातावरण आहे, गणेशोत्सव तोंडावर आला आहे. अशा परिस्थितीत कोरोनाची रुग्ण संख्या वाढल्याने चिंता वाढली आहे.

मुंबईत पुन्हा एकदा कोरोनानं डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून नियंत्रणात आली होती. पण आता पुन्हा शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आकडेवारीनुसार, बुधवारी शहरात कोरोना रुग्णाची ९७५ नोंद झाली तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला. नवीन प्रकरणांसह, मुंबईत आतापर्यंत कोरोना रुग्णांची ११,३५,६८० प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर १९,६७० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

मुंबईत गेल्या २४ तासांत ११,२५३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यासह, आतापर्यंत १,७९,८०,३७० नमुने तपासण्यात आले आहेत.त्यानुसार मुंबईत सध्या ५ हजार ७१२ रुग्ण उपचार घेत आहेत. गेल्या २४ तासात राज्यात २२४६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहेत. तर १९२० रुग्ण बरे झाले आहेत.

ही आहे दहा दिवसांची आकडेवारी

  • १८ ऑगस्ट २०२२-१२०१
  • १७ ऑगस्ट २०२२- ९७५
  • १६ ऑगस्ट २०२२- ३३२
  • १५ ऑगस्ट २०२२- ५८४
  • १४ ऑगस्ट २०२२- ८८२
  • १३ ऑगस्ट २०२२-८६७
  • १२ ऑगस्ट २०२२-८७१
  • ११ ऑगस्ट २०२२-६८३
  • १० ऑगस्ट २०२२- ८५२
  • ०९ ऑगस्ट २०२२- ४७९

Tags: coronamumbaiकोरोनाकोरोना रुग्णांच्या संख्येत वाढमुंबई
Previous Post

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष: सोमवारी सुनावणी की फक्त घटनापीठाचा निर्णय आणि पुढची तारीख?

Next Post

राज्यात २२८५ नवे रुग्ण, २२३७ बरे! मुंबई १०११, नाशिक ९, नागपूर २५ नवे रुग्ण !!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात २२८५ नवे रुग्ण, २२३७ बरे! मुंबई १०११, नाशिक ९, नागपूर २५ नवे रुग्ण !!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!