मुक्तपीठ टीम
कोरोना काळात केलेल्या अॅलोपॅथीवरील वादग्रस्त वक्तव्यावरून योग गुरु बाबा रामदेव गेल्या काही दिवसांपासून वादाचा भोवऱ्यात आहे. बुधवारी दिल्ली उच्च न्यायालयाने सांगितले की, अॅलोपॅथीच्या विरोधात कोणीही दिशाभूल करू नये. तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्या अशा लोकांचे स्वागत आहे, मात्र अधिकृत काहीही बोलून लोकांमध्ये गैरसमज पसरवू नका, असे खडेबोल बाबा रामदेव यांना सुनावले.
बाबा रामदेव यांना न्यायालयाने सुनावले!!
- बाबा रामदेव यांनी कोरोना काळात डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर टीका केली होती.
- त्यांच्या टीकेला डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र विरोध केला होता.
- त्याचवेळी दिल्ली मेडिकल असोसिएशनने दिल्ली उच्च न्यायालयात याविरोधात याचिका दाखल केली होती.
- दिल्ली मेडिकल असोसिएशनच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती भंबानी म्हणाले की, “माझी चिंता आयुर्वेदाचे नाव आणि प्रतिष्ठा वाचवण्याची आहे.
- अॅलोपॅथीच्या विरोधात कोणाचीही दिशाभूल होऊ नये, हा माझा उद्देश आहे.
- न्यायमूर्ती पुढे म्हणाले की, मी लस घेणार नाही असे म्हणणे वेगळी गोष्ट आहे.
- लसीला विसरा ही निरुपयोगी आहे, पण ती घ्या, असं म्हणणं ही एक वेगळी गोष्ट आहे.
- तुमचे अनुयायी, शिष्य आणि तुमच्यावर विश्वास ठेवणार्या अशा लोकांचे स्वागत आहे, मात्र अधिकृत काहीही बोलून कोणाचीही दिशाभूल करू नये
काय म्हणाले होते बाबा रामदेव?
- बाबा रामदेव यांनी कोरोना काळात डॉक्टरांच्या उपचार पद्धतीवर टीका केली होती.
- २०२१ मध्ये त्यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. ज्यात त्यांनी कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या काही औषधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.
- तसेच ते या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत की, कोरोनासाठी अॅलोपॅथिक औषधे घेतल्यानंतर लाखो लोक मरण पावले आहेत.