Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टपाल कार्यालयांमधून १० दिवसांमध्ये एक कोटी राष्ट्रध्वजांची विक्री!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Post Dept

मुक्तपीठ टीम

दीड लाख टपाल कचेऱ्यांच्या सर्वव्यापी नेटवर्कद्वारे टपाल विभागाने “घरोघरी तिरंगा” कार्यक्रम देशातील प्रत्येक नागरिकापर्यंत पोचवला आहे. 10 दिवसांच्या अल्पावधीत भारतीय टपाल विभागाने टपाल कार्यालयांद्वारे तसेच ऑनलाइन पद्धतीने 1 कोटींहून अधिक राष्ट्रध्वज नागरिकांना विकले आहेत. हे ध्वज टपाल विभागाकडून 25 रुपये इतक्या किफायतशीर किमतीत विकले गेले आहेत. टपाल विभागाने ऑनलाइन पद्धतीने विक्री केल्या जाणाऱ्या ध्वजांची देशभरातील कोणत्याही पत्त्यावर मोफत घरपोच वितरण सुविधा प्रदान केली असून ई पोस्ट ऑफिस सुविधेद्वारे नागरिकांनी 1.75 लाखांहून अधिक ध्वजांची ऑनलाइन खरेदी केली आहे.

देशभरातील 4.2 लाख समर्पित टपाल कर्मचाऱ्यांनी शहरे, गावे आणि खेडी, सीमावर्ती भाग, नक्षलग्रस्त जिल्हे, डोंगराळ आणि आदिवासी भागात “हर घर तिरंगा” संदेशाचा उत्साहाने प्रचार केला आहे. प्रभात फेरी, बाईक रॅली आणि चौक सभांच्या माध्यमातून भारतीय टपाल विभागाने “हर घर तिरंगा” हा संदेश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवला आहे. डिजिटली संपर्कात असलेल्या नागरिकांमध्ये कार्यक्रमाचा संदेश पोहोचवण्यासाठी ट्विटर आणि फेसबुकसारख्या समाज माध्यमांचा देखील मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला आहे. टपाल कचेऱ्यामधून राष्ट्रध्वजाची विक्री 15 ऑगस्ट 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. नजीकच्या टपाल कचेरीमध्ये जाऊन किंवा इ पोस्ट ऑफिस (epostoffice.gov.in) ला भेट देऊन नागरिक राष्ट्रध्वज मिळवू शकतात आणि “हर घर तिरंगा” अभियानाचा भाग बनू शकतात. नागरिक ध्वजासह सेल्फी देखील घेऊ शकतात आणि सेल्फी www.harghartiranga.com या संकेतस्थळावर अपलोड करून याद्वारे नव भारताच्या सर्वात मोठ्या उत्सवात त्यांचा सहभाग नोंदवू शकतात.


Tags: Amrit Mahotsav of FreedomHar Ghar tirangaIndia flagIndian Postal Departmentघरोघरी तिरंगाभारतीय टपाल विभागराष्ट्रध्वजस्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
Previous Post

राज्यात २०४० नवे रुग्ण, १९०४ बरे! मुंबई ८६७, पुणे २९५ नागपूर ८९ नवे रुग्ण!!

Next Post

राज्यभरातील ३६ कारागृहांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी उमटले “जीवनगाणे गातचं जावे”चे सूर…

Next Post
Central Jail Cultural Programme

राज्यभरातील ३६ कारागृहांमध्ये एकाच दिवशी एकाच वेळी उमटले “जीवनगाणे गातचं जावे”चे सूर...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!