Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

टपाल खात्याने कामाठीपुऱ्यात शरीरविक्रय करणाऱ्यांसोबत साजरा केला रक्षाबंधन सण, तिरंगा झेंड्यांचंही वाटप!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Rakshabandhan In kamathipura

मुक्तपीठ टीम

भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने आज रक्षाबंधनाचे औचित्य साधत ‘सुरक्षा का बंधन, रक्षा बंधन’ या मोहिमेअंतर्गत कामाठीपुरा येथील शरीरविक्रय व्यवसायातील व्यक्तींसाठी स्तनाचा कर्करोग आणि गर्भाशयाच्या कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन केले होते. भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने, कामा रुग्णालयाच्या सहकार्याने या वैदयकीय तपासणी शिबिराचे आयोजन केले .

आग्रीपाडा टपाल कार्यालय परिसरात १५० हून अधिक शरीरविक्रय व्यावसायिक शिबिरात सहभागी झाले होते. या शिबिराचे आयोजन शरीरविक्रय व्यावसायिकांची गोपनीयता आणि सुरक्षितता लक्षात ठेऊन करण्यात आले होते. याशिवाय कामाठीपुरा येथील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना शिबिरही घेण्यात आले.

त्यानंतर, भारतीय टपाल खात्याच्या, मुंबई विभागाच्या, पोस्टमास्टर जनरल, स्वाती पांडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कामाठीपुराच्या १४ व्या गल्लीला भेट दिली आणि शरीरविक्रय व्यावसायिकांना राख्या बांधल्या. त्यांच्या आणि त्यांच्या मुलांच्या प्रति प्रेम, समानता आणि आदराचे बंधन व्यक्त करणे हा त्यामागचा उद्देश होता.

भारतीय टपाल खात्याच्या मुंबई विभागाने आगामी ७५ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत आपल्या मातृभूमीबद्दल देशभक्ती आणि अखंडतेची भावना जागृत करण्यासाठी शरीरविक्रय व्यावसायिकांच्या घरी “तिरंगा”, राष्ट्रीय ध्वज वितरित केले. या रहिवाशांना आपण या देशाचे नागरीक असून देशाचा अविभाज्य भाग असल्याची जाणीव करुन देणे आहे हा हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत राबवलेल्या या मोहिमेचा उद्देश होता.

भारतीय टपाल खात्याचा मुंबई विभाग, शरीरविक्रय व्यवसायिकांची सामाजिक स्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी एका वर्षाहून अधिक काळ प्रयत्न करत आहे.

पाहा:


Previous Post

पुण्याच्या वासुदेवांची महाराष्ट्रभर भ्रमंती, प्रसन्न परंपरा सकाळ प्रसन्न करणारी!

Next Post

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉन १५ जानेवारी २०२३ला! अशी करा नोंदणी…

Next Post
Tata Mumbai Marathon 2023

आशियातील सर्वात मोठ्या टाटा मुंबई मॅरेथॉन १५ जानेवारी २०२३ला! अशी करा नोंदणी...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!