मुक्तपीठ टीम
चिनी अॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता देशात आता चिनी स्मार्टफोन कंपन्यांवरही धडक कारवाईची सुरुवात केली आहे. आता चिनी स्मार्टफोन कंपन्यांच्या काही मोबाईल्सवर बंदी घालण्याची तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे. चिनी स्मार्टफोन कंपन्यांच्या १२ हजारांपेक्षा कमी किमतीच्या काही मोबाईल्सच्या विक्रीवर देशात बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. सरकारच्या या निर्णयाचा उद्देश एंट्री लेव्हल सेगमेंटमध्ये स्थानिक कंपन्यांचे वर्चस्व कायम राखणे हा आहे.
चिनी ब्रँड्स भारतीय कंपन्यांसाठी धोका
- देशात स्वस्त चायनीज मोबाईलची क्रेझ वाढल्याने देशांतर्गत मोबाईल कंपन्यांना मोठा फटका बसला आहे.
- आता देशांतर्गत कंपन्यांना पाठिंबा देण्यासाठी केंद्र सरकार १५० डॉलर किंवा त्यापेक्षा कमी किंमतीच्या म्हणजेच १२ हजार रुपये किंवा त्याहून कमी किमतीच्या चायनीज मोबाईलवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे.
- या निर्णयाचा सर्वात मोठा झटका Xiaomi Corporation ला बसणार आहे, कारण बजेट स्मार्टफोन विकण्यात ती नंबर १ कंपनी आहे.
- ही कंपनी Xiaomi, Redmi, Mi, POCO इत्यादी ब्रँड अंतर्गत स्मार्टफोन विकते.
Xiaomi चे शेअर ३५ टक्क्यांनी घसरले
- भारतात स्वस्त चिनी फोनवर बंदी असल्याच्या बातम्या आल्याने सोमवारी हाँगकाँगमध्ये ट्रेडिंगच्या शेवटच्या क्षणी Xiaomi चे शेअर घसरले.
- ३.६ टक्क्यांनी घसरले, ज्यामुळे यावर्षी ३५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली.
- जून २०२२ पर्यंतच्या तिमाहीत १२ हजार पेक्षा कमी स्मार्टफोन्सचा भारताच्या एकूण विक्रीत एक तृतीयांश वाटा आहे, ज्यामध्ये चीनी कंपन्यांचा वाटा ८० टक्के आहे.