मुक्तपीठ टीम
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ क्रांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटना यांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” अंतर्गत दिनांक १३ ऑगस्ट, २०२२ ते दिनांक १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये “घरोघरी तिरंगा” हा उपक्रम राबविणेत येत आहे. भारतीय स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव हा सर्व भारतीय नागरीकांसाठी अत्यंत अभिमानाचा आणि राष्ट्रासाठी गौरवाचा आहे. पण त्याच वेळी घरोघरी तिरंगा फडकवताना काय करावं आणि काय करु नये, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
“घरोघरी” उपक्रम अंमलबजावणीकरिता मार्गदर्शक सूचना
काय करावे?
- ध्वज हाताने कातलेल्या आणि हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सूत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क /खादीपासून बनविलेल्या कपड्याचे असावे.
- विभाग / कार्यालय प्रमुख/नागरीक यांनी आपले कार्यालयावर/घरावर दिनांक १३ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत ध्वज फडकवावा.
- ज्या ज्या ठिकाणी ध्वज उभारतात अशा प्रत्येक ठिकाणी तो उच्च स्थानी आणि स्पष्टसपणे दिसेल अशा रितीने लावला पाहिजे.
- दिनांक १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२२ रोजी ध्वज सुर्योदयावेळी फडकवावा व सुर्यास्तावेळी उतरवावा याबाबत कार्यालयांना ध्वज संहिता पाळावी लागेल.
- घरोघरी तिरंगा फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरवयाची आवश्यकता नाही.
- ध्वज लावताना केशरी रंगाची बाजू काठीच्या वरच्या टोकाकउे असावी. ध्वज उलटा फडकवला जाणार नाही याची काळजी घ्यावी.
- ध्वज उतरविल्यानंतर त्यांची व्यवस्थित घडी घालून तो कपाटात ठेवावा.
- सर्व अधिकृत समारंभात लावला जाणारा ध्वज हा भारतीय मानक कार्यालयाच्या निकषानुसार व त्यांचे बोधचिन्ह असलेलाच असेल.
- हर घर तिरंगा बाबत फोटो व माहिती अपलोड करण्यासाठी १. https://amritmahotsav.nic.in व २. https://mahaamrut.org/ या लिंकचा वापर करावा.
- जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथील sangliweb@gmail.com यावरही माहिती व फोटो पाठविणेत यावेत.
काय करू नये?
- प्लास्टिकच्या ध्वजाचा वापर करु नये.
- ध्वज फाटलेला अथवा चुरगळलेला लावता कामा नये.
- ध्वज ज्या काठीवर फडकत असेल त्या काठीवर किंवा त्या काठीच्या वरच्या टोकावर फुले किंवा हार घालु नयेत.
- इतर कोणताही ध्वज राष्ट्रीय ध्वजापेक्षा उंच नसावा व राष्ट्रीय ध्वजाच्या लगत नसावा.
- ध्वजाचा स्पर्श जमीनीस होऊ देऊ नये अथवा तो पाण्यावरुन फरफटत नेऊ नये.
- ध्वज फाटेल अशा पध्दतीने फडकवू नये अथवा बांधू नये.
- ध्वज मलीन होईल अशा प्रकारे वापरु नये अथवा ठेवू नये.
- ध्वजावर कोणत्याही प्रकारचे अक्षरे लिहू नयेत.
- अभियान कालावधीनंतर झेंडा फेकला जाऊ नये. तो सन्मानाने जतन करुन ठेवावा.