मुक्तपीठ टीम
एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीमुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वर्षा बंगला सोडावा लागला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, अद्याप शिंदे हे मुख्यमंत्र्यासाठी असलेल्या वर्षा बंगल्यावर राहण्यासाठीही गेले नाहीत. दरम्यान आता एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी वर्षा निवासस्थानी लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे वर्षा निवासस्थानी राहण्यासाठी जाणार असल्याती शक्यता वर्तवली जात आहे.
वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी!!
- एकनाथ शिंदे यांनी ३० जून रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
- तरीही त्यांनी ‘नंदनवन’वरून आपला मुक्काम हलवला नाही.
- शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यभरातील नेते, खासदार, आमदार, कार्यकर्ते त्यांच्या भेटीसाठी येत आहेत.
- त्यामुळे हा बंगला अपुरा पडू लागला आहे. शिवाय मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ‘नंदनवन’ हा पोलिसांसाठी गैरसोयीचा आहे.
- मुख्यमंत्र्यांचा राजशिष्टाचार लक्षात घेऊन शिंदे यांनी ‘वर्षा’वर मुक्कामाला यावे, अशी विनंती त्यांना करण्यात आली होती.
- अखेर एक महिन्यानंतर वर्षा बंगल्याला एकनाथ शिंदेंच्या नावाची पाटी लावली गेलीय.
- तसेच वर्षा बंगल्याची रंगरंगोटी देखील पुर्ण झाल्याची माहिती तिथल्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
२०१४ पासून एकनाथ शिंदे ‘नंदनवन’ बंगल्यात राहतात!!
- एकनाथ शिंदे जरी वर्षावर राहायला गेले तरी ते ‘नंदनवन’ या सरकारी बंगल्याचा ताबा मात्र कायम ठेवणार असल्याचे कळते.
- एकनाथ शिंदे २०१४ पासून मलबार येथील नंदनवन या शासकीय निवासस्थानातून आपला कारभार चालवत आले आहेत.
- गेल्या सात-साडेसात वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत शिंदे यांच्यासाठी ‘नंदनवन’ बंगला अतिशय फलदायी ठरल्याचे बोलले जाते.
- शिंदे हे वर्षावर जाणार असले तरी सुरूवातीचे काही महिने ते वर्षा बंगल्यावर केवळ सरकारी कामकाज करतील, बैठका घेतील अशी खात्रिलायक माहिती आहे.