मुक्तपीठ टीम
गोरेगाव पत्राचाळ घोटाळाप्रकरणी ईडीच्या अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा कोठडीतील मुक्काम आणखी चार दिवसांनी वाढला आहे. संजय राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावण्यात आली. संजय राऊत चौकशीत सहकार्य करत नाहीत, असा आरोप ईडीने कोर्टात केला. दरम्यान पत्राचाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने समन्स बजावलं आहे.
संजय राऊत यांना ४ दिवसांची ईडी कोठडी!!
- पत्राचाळीतील घोटाळ्याच्या आरोपाप्रकरणी त्यांना ३१ जुलै रोजी ईडीने ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याच दिवशी त्यांना अटक करण्यात आली होती.
- त्यानंतर दुसऱ्या दिवशी कोर्टाने त्यांनी तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती.
- त्यानंतर आता त्यांना पुन्हा चार दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
- सुनावणी दरम्यान संजय राऊतांनी ईडी कोठडीच्या व्यवस्थेबाबत कोर्टाकडे तक्रार केली होती.
- त्याचबरोबर स्वप्ना पाटकर यांच्या वकिलांनीही धमक्या दिल्याचा आरोप त्यांच्यावर केला होता.
- पण ते कोठडीत असताना ते धमक्या कसे देऊ शकतात असा प्रतिप्रश्न कोर्टाने त्यांना केला होता.
- त्यानंतर अलिबाग येथील जमीन खरेदीवेळी राऊतांच्या पत्नीच्या अकाऊंटवर आलेल्या पैशांच्या संबंधात चौकशी करण्याची मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती.
- यावेळी राऊतांच्या वकिलांनी युक्तिवाद करताना अकाऊंटवर आलेले पैसे हे अनोळखी व्यक्तीने पाठवले असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.
- तर हे पैसे कुणी आणि का पाठवले याची चौकशी करायची असल्याचं सांगत ईडीच्या वकिलांनी कोठडीची मागणी केली होती.
- दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेत ईडीने संजय राऊतांना ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.
संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स!!
- प्रकरणामध्ये संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सुद्धा ईडीने समन्स पाठवले आहे.
- पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी जे काही व्यवहार झाले त्यात प्रामुख्याने अलीबाग येथील जमीनीसह अनेक व्यवहार हे वर्षा राऊत यांच्या नावावर झाले आहेत.
- वर्षा राऊत यांच्या बँक खात्यात करोडो रुपयांचे व्यवहार झाले आहेत.
- खात्यात हे पैसे कुणी ट्रान्सफर केले.
- या कथीत घोटाळ्यात वर्षा राऊत यांचा नेमका संबंध काय या सगळ्याचीच ईडी चौकशी करणार आहे.
- वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उद्या सकाळी ११ वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या.
- यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती.