मुक्तपीठ टीम
गुगल मॅप म्हटलं तर प्रवासात रस्ता शोधण्याची काळजी नसते. हरवण्याचीही नाहीच नाही. ही सेवा फक्त काही सेकंदात आपलं डेस्टिनेशन शोधून देते. आतापर्यंत गुगल मॅपवर सॅटेलाइट फोटो असायचे, पण आता त्यात खरे फोटो असतील. गुगलने आता जेनेसिस इंटरनॅशनल आणि टेक महिंद्रा यांच्या भागीदारीत, रस्त्यांचे खरे फोटो पाहण्यासाठी ही सेवा सुरू केली आहे. रस्त्याचे फोटो आता गुगल मॅपवर उपलब्ध होणार आहे.
भारतातील १० शहरांमधील रस्त्यांचे फोटो आता गुगल मॅपवर पाहता येतील. तंत्रज्ञान कंपनीने यासाठी दोन स्थानिक कंपन्यांशी भागीदारी केली आहे. सरकारने यापूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव रस्ते आणि इतर ठिकाणांचे रुंद-फलक फोटो प्रदर्शित करण्यास परवानगी दिली नव्हती.
- ही सेवा बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक, वडोदरा, अहमदनगर आणि अमृतसर येथे सुरु झाली आहे.
- गुगल, जेनेसिस इंटरनॅशनल आणि टेक महिंद्रा यांनी २०२२ पर्यंत ५० हून अधिक शहरांमध्ये सेवा विस्तारित करण्याची योजना आखली आहे.
- गुगल मॅपवर ट्रॅफिक अधिकाऱ्यांनी जारी केलेल्या वेगमर्यादेचे आकडेही दाखवले जातील.
- गुगलने ‘ट्रॅफिक लाइट्स’च्या वेळेला अनुकूल करण्यासाठी मॉडेलवर बेंगळुरू ट्रॅफिक पोलिसांसोबत भागीदारीची घोषणा केली आहे.
- गुगल स्थानिक वाहतूक प्राधिकरणांच्या भागीदारीत कोलकाता आणि हैदराबादमध्येही विस्तार करेल.
- याशिवाय, जागतिक कंपनीने हवेच्या गुणवत्तेची माहिती देण्यासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाशी (CPCB) करार करण्याची घोषणा केली आहे.