मुक्तपीठ टीम
कर्नाटकातील बेल्लारे येथिल भाजपाचे युवा नेते प्रवीण नेतरू यांच्या हत्येमुळे राज्यभरात पक्षाच्या सोशल मीडिया मॅनेजमेंट टीमसह भाजपा युवा मोर्चाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मोठा धक्का बसू शकतो. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटेल यांच्याविरोधात प्रचंड नाराजी आहे. प्रवीणच्या हत्येनंतर, विजयपूर, बागलकोट, दक्षिण कन्नड, चित्रदुर्ग, हुबळी आणि कोप्पलसह विविध जिल्ह्यातील भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. यातून पक्षाचे नेते आणि सरकारला संदेश देण्याचे काम त्यांनी केले आहे.
चिक्कमगलुरू जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष संदीप अरविनांगडी यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. संदीप यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेण्यासही राजी केले. पक्षाचे सोशल मीडिया अकाउंट मॅनेज करणाऱ्या सुमारे १०० लोकांनी आपण यापासून दूर राहणार असल्याचे जाहीर केले आहे.
भाजपचे प्रदेश प्रचारक एमजी महेश यांनी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या पदांचा राजीनामा न देण्याचे आवाहन केले. पक्ष त्यांना कधीही निराश करणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. त्याचवेळी तुमकूरमध्ये भाजपा कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून राजीनामे सादर केले. भाजपा नेत्या रेखा शंभू यांनी आपल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, धर्म आपल्यासाठी महत्त्वाचा असून धर्माला आपले पहिले प्राधान्य आहे.
त्याचवेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई म्हणाले की, कर्नाटक सरकारने नेतरूच्या हत्येचा तपास एनआयएकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या तरुण कार्यकर्त्याची हत्या हा सुनियोजित आणि संघटित गुन्हा असल्याचे ते म्हणाले. ते म्हणाले, ‘त्याचे आंतरराज्य परिमाण पाहिले जात आहे. याबाबत राज्याचे डीजी आणि आयजी यांच्याशी बोलून संपूर्ण माहिती मागवली आहे.