मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातला आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाचा प्रसार वाढला असून, रुग्णसंख्येचे प्रमाण वाढल्याचे आकडेवारीतून दिसत आहे. दरम्यान, देशात २४० नवे कोरोना स्ट्रेन आढळून आला आहे. महाराष्ट्रात सापडलेला कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन हा अत्यंत संसर्गजन्य आणि धोकादायक असल्याची शक्यता असल्याचा इशारा एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एनडीटीव्ही न्यूज चॅनलशी बोलताना दिला आहे. कोरोनाच्या या नवा स्ट्रेनचा अॅण्टीबॉडीज तयार झालेल्या लोकांनाही संसर्ग होऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया नव्या कोरोना स्ट्रेनबद्दल काय सांगितले?
- देशात कोरोनाचे २४० नवीन स्ट्रेन आढळून आले आहेत.
- महाराष्ट्रात आढळून आलेला स्ट्रेन जास्त घातक ठरू शकतो.
- “भारतात हर्ड इम्युनिटी ही कल्पनाच ठरणार आहे. कारण त्यासाठी देशाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८० टक्के लोकांमध्ये अॅण्टीबॉडीज तयार होण्याची आवश्यकता असेल.
- महाराष्ट्रात आढळून आलेल्या नव्या कोरोना स्ट्रेनच्या धोक्याची शक्यता लक्षात घेतली तर हे अवघड दिसत आहे.
- या स्ट्रेनच्या संसर्गाचा वेग प्रचंड असून, तो जास्त घातक ठरू शकतो.
- ज्या नागरिकांमध्ये अॅण्टीबॉडीज विकसित झालेल्या आहेत. त्यांनाही याचा संसर्ग होऊ शकतो.