Wednesday, September 30, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिडकोच्या ९६ सदनिकांचे बांधकाम केवळ ९६ दिवसात! बांधकाम क्षेत्रात इतिहास!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
cidco

मुक्तपीठ टीम

सिडको महामंडळाने डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको यांच्या मार्गदर्शनाखाली, जगप्रसिद्ध प्रीकास्ट या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून ९६ सदनिका असणाऱ्या १२ मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ ९६ दिवसांत पूर्ण केले आहे. याद्वारे प्रधानमंत्री आवास योजनेतील “सर्वांसाठी घरे” हे उद्दिष्ट जलद गतीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने सिडकोने गृहनिर्माण क्षेत्रात इतिहास रचला आहे.

सिडकोतर्फे ‘परिवहन केंद्रीत विकास’ संकल्पनेवर आधारित प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत महागृहनिर्माण योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. या योजनेंतर्गत नवी मुंबईच्या विविध नोडमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटांसाठी सदनिकांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. सिडकोने ‘मिशन 96’ अंतर्गत कमीत कमी वेळात बांधकाम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठरवले होते. त्यानुसार कंत्राटदार मे. लार्सन ॲन्ड टुब्रो यांनी बांधकाम वेगाने पूर्ण करण्यासह सुरक्षित आणि मजबूत घरे बांधण्याकरिता प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. प्रीकास्ट तंत्रज्ञानाचा वापर करून, ९६ सदनिका असणाऱ्या १२ मजली निवासी इमारतीचे बांधकाम केवळ 96 दिवसांत पूर्ण करण्यात आले आहे. ४ एप्रिल २०२२ रोजी सुरू झालेले १२ मजली इमारतीचे बांधकाम ९ जुलै २०२२ रोजी पूर्ण करण्यात आले असून यामुळे रेरा कायद्यातील वेळेत बांधकाम पूर्ण करण्याच्या मानकाचेदेखील अनुपालन करण्यात आले आहे.

“मिशन 96 च्या निमित्ताने नियंत्रित वातावरणात, मजला बांधणीचा कालावधी कमी करण्यासह कमी मनुष्यबळाच्या उपलब्धतेसह उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यासाठी प्रीकास्ट तंत्रज्ञान किती सक्षम आहे हे सिद्ध झाले आहे.” प्रीकास्ट तंत्रज्ञान हे भविष्यात सर्वोत्तम गुणवत्तेसह नियंत्रित वातावरणात यांत्रिक पद्धतीने निवासी इमारतींचे बांधकाम जलद गतीने पूर्ण करण्यासाठी महत्त्वाचे मानले जाते. सदर बांधकामामध्ये वास्तुशास्त्रीयदृष्ट्या परिपूर्ण (फिनिशिंग) करण्यासह अधिसंरचनेच्या (सुपरस्ट्रक्चर) १९८५ प्रीकास्ट घटकांचे उत्पादन (प्रॉडक्शन) आणि प्रतिष्ठापन (इन्स्टॉलेशन) करणे आणि ६४ हजार चौ. फुट बांधीव क्षेत्रावर यांत्रिक, विद्युत, नळकाम विषयक कामे (एमईपी) करण्याचा समावेश होता. बांधकाम तंत्रज्ञानाव्यतिरिक्त बांधकामाच्या प्रगतीवर देखरेख करण्यासाठी डिजिटल
तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला आहे.

गृहनिर्माणातील या यशासह सिडकोने नवी मुंबईमध्ये हक्काचे घर घेऊ इच्छिणाऱ्या हजारो कुटुबांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. या प्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे घरांची गुणवत्ता आणि सुरक्षितता सुनिश्चित झाली आहे.


Tags: CIDCOCIDCO ConstructionCIDCO Flatsgood newsmuktpeethघडलं-बिघडलंचांगली बातमीमुक्तपीठसिडकोसिडको बांधकामसिडको सदनिका
Previous Post

राज्यात १९९७ नवे रुग्ण, २४७० रुग्ण बरे! मुंबई २९०, नाशिक ५२, नागपूर ७९ नवे रुग्ण !!

Next Post

रविवारआधी तिकिट करा बुक, फक्त १४९९ रुपयांमध्ये विमान प्रवास!

Next Post
air asia

रविवारआधी तिकिट करा बुक, फक्त १४९९ रुपयांमध्ये विमान प्रवास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!