मुक्तपीठ टीम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक सामनाला दिलेल्या मुलाखतीत बंडखोरांना माझ्या वडिलांचा फोटो न वापरता निवडून या असे आव्हान दिले. त्यांच्या या आव्हानावर भाजापा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आक्षेप घेतला. मग तुम्ही मोदींचा फोटो २०१९ च्या निवडणुकीत का लावला असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यांच्या या प्रश्नावर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी त्यांना चांगलंचं सुनावलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांचे डोके ठिकाणावर आहे का ? असा खोचक टोला त्यांनी मुनगंटीवार यांना लगावला आहे.
भाजपा नेत्यांचे बेताल वक्तव्ये.@BJP4Maharashtra @ShivSena pic.twitter.com/sdV52ecRD9
— Dr.ManishaKayande (@KayandeDr) July 26, 2022
मनीषा कायंदे यांनी काय म्हटलंय?
- भाजपा नेत्यांची बेताल वक्तव्ये, अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली आहे.
- भाजपाचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सामनाला दिलेल्या उद्धवजींच्या मुलाखतीतील “बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो का लावता ?
- या वक्तव्याला आक्षेप घेताना मग तुम्ही मोदींचा फोटो का लावला निवडणुकीत असा प्रश्न विचारला. सुधीर भाऊ वरिष्ठ भाजप नेते आहेत मात्र सध्या मंत्रिमंडळ विस्तार होत नसल्यामुळे त्यांचे डोके ठिकाणावर नाही.
- उद्धवजी हेच म्हणत आहेत, आम्ही युतीत असताना बाळासाहेब आणि अटलजी, अडवाणीजी आणि पंतप्रधान म्हणून मोदीजींचे फोटो वापरले. आम्ही तेव्हा भाजप आमचाच पक्ष असे म्हणालो नाही किंवा भाजप फोडायलाही गेलो नाही !
- पण आता जे भाजपच्या जोरावर राजकारण करून शिवसेना गिळायला बघत आहेत. ते बाळासाहेबांचा आणि दिघेसाहेबांचा फोटो लावून राजकारण करत आहेत.
- आता त्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली आहे मग त्यांना बाळासाहेबांचा फोटो लावण्याची का आवश्यकता भासते ? त्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश करावा आणि मोदींच्या नावाने मतें मागवीत.