पुण्यातील खराडी येथील कोहकाडे सुपर स्पेशालिटी रूग्णालयाबद्दल सणसवाडी येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने तक्रार केली होती. रुग्णालयाकडून एका पीपीई किटसाठी ६ हजार ३०० रुपये आकारले जातात. ही किंमत बाजारभावापेक्षा २० पट अधिक आहे. या रुग्णालयाने शेतकऱ्याला ४ लाख ४६ हजार रुपये भरण्यास सक्ती केली होती. बिलामध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात आलेल्या १३ दिवसांसाठी वापरलेल्या १३ पीपीई किट्ससाठी ८१ हजार ९०० रुपये लावले होते.
तसेच संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय रुग्णाला सोडण्यात आले नाही. घरी जाण्यासाठी त्याला नातेवाईकांकडून पैसे घ्यावे लागले. त्याविरोधात रुग्णाने आरोग्य विभागाकडे तक्रार केली असता सुनावणी झाली. त्यानंतर रुग्णालयाने पीपीई किटसाठी घेतलेले जास्त पैसे परत दिले.
जिल्हा प्रशासन आणि पुणे महानगरपालिका कॉर्पोरेशनने (पीएमसी) याबद्दल चौकशी केली. त्यातून निष्कर्ष काढण्यात आला की, रुग्णालय वैद्यकीय बिलांमध्ये जास्त रक्कम आकारण्यास दोषी आहे. रुग्णालय प्रशासनाने सोमवारी अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर रुग्णांमार्फत ९० हजार रुपये परत करण्यात आले आहेत.
रूग्णाला मदत करणार्या माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत वारघडे यांनी, प्रथम मोठ-मोठी बिले द्या आणि नंतर रक्कम परत करा. कोरोना रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण करणाऱ्या या रुग्णालय प्रशासनावर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हंटले आहे.