मुक्तपीठ टीम
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीच्या पहिल्या भागात एकनाथ शिंदेंच्या बंडावर भाष्य केलं आहे. या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात त्यांनी एकनाथ शिंदेंना गद्दार नाही तर आता विश्वासघातकी म्हणतो, असं सुनावलं आहे. पहिल्या भागातही एकनाथ शिंदे यांचं नाव एकदाही न घेता उद्धव ठाकरेंनी अनेकदा शिंदेंचा उल्लेख ‘पालापाचोळा’ असा केला. या विधानावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे. हे जनतेला माहिती आहे, असे ते म्हणाले.
पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे!!
- एकनाथ शिंदे म्हणाले, त्यांना आणखी काही बोलायचं आहे ते बोलून होऊ द्या.
- पूर्ण बोलून झालं की मग मी एकत्रित त्यावर बोलन.
- त्यांना वाटतं आम्ही पालापाचोळा आहे, पण या पालापाचोळ्यानेच इतिहास घडवला आहे.
- हे जनतेला माहिती आहे.
- इतिहास घडवणारे कोण असतात हे लोकांनी पाहिलं आहे.
- आमची लढाई सत्तेसाठी नाही.
- आमची लढाई शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांसाठी होती.
- त्यातूनच आम्ही ही भूमिका घेतली आहे.
- त्यामुळे पालापाचोळा, पानगळ जे म्हणायचं आहे तो त्यांचा अधिकार आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे ?
- खरं सांगायचं तर मला चिंता नाहीये.
- चिंता माझी नाहीये, शिवसेनेची तर बिलकूल नाहीये.
- मात्र थोडीफार चिंता आहे ती नक्कीच मराठी माणसांची, हिंदूंची आणि हिंदुत्वाची आहे.
- याचं कारण हिंदुद्वेष्टे, मराठीद्वेष्टे हे आपल्या घरातच आहेत. मराठी माणसांची एकजूट तुटावी, हिंदूंमध्ये फूट पडावी आणि मराठी माणसाची, हिंदूंची एकजूट करण्यासाठी जी मेहनत माननीय शिवसेनाप्रमुखांनी हयातभर केली ती आपल्याच काही कपाळकरंट्याच्या हातून तोडावी, मोडावी असा हा प्रयत्न केला जातोय याची मला चिंता आहे.
- म्हणून मी जे म्हटलं की, हा पालापाचोळा सध्या उडतोय; तो उडू द्या.
- इकडून पालापाचोळा तिकडे जातोय, जी पानं गळणं गरजेची होती ती पानं उडतात.
- म्हणजे नवी पालवी फुटेल.