मुक्तपीठ टींम
बाप अखेर बाप असतो, मग तो सुपरस्टार का असेना! अभिनेता ह्रतिक रोशनचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. बंजी जंप करण्यासाठी पुढे जाताना मुलगा काहीसा घाबरताना दिसला तेव्हा ऋतिकने मुलाची हिंमत वाढवली. जणू शिकवलं…”मागे टाक भय, असतो पुढे विजय!”
हृतिक रोशन हा एक उत्तम अभिनेता तर आहेच, परंतु अभिनयासह तो आपल्या कौटुंबिक जीवनात पिता म्हणूनही भूमिका बजावताना दिसत आहे. हृतिक रोशनच्या सुझैन खानसोबत घटस्फोटानंतर वैवाहिक जीवन संपलं असेल, परंतु एक गोष्ट जी बदलली नाही ती म्हणजे हृतिकचे त्याच्या मुलांसोहत असणारे संबंध. रेहान आणि ह्रदान यांच्यावर हृतिकचे अतिशय प्रेम आहे. हृतिक हा एक सुपरडॅड आहे. तो आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून मुलांसोबत चांगला वेळ घालवताना दिसतो. ह्रतिकच्या मुलाच्या बंजी जम्पच्यावेळचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय…तो त्यांचं बापपण दाखवतोय…
हृतिकने दिलेल्या या प्रोत्साहनातून बाप अखेर बाप असतो हे समजते.
हृतिक रोशनने शेअर केलेला मुलासोबतचा व्हिडिओ जबरदस्त चर्चेत
- हृतिक रोशनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक थ्रोबॅक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
- या व्हिडीओमध्ये सुपरस्टार डॅड आपल्या दोन मुलांसोबत एका अॅडव्हेनचरस ट्रीपवर गेलेला दिसत आहे.
- मात्र, अॅडव्हेनचरस ट्रीपमध्ये बंजी जंपिंग करताना त्याचा मुलगा रिदान या व्हिडीओमध्ये थोडा घाबरलेला दिसत आहे. परंतु हृतिक त्याच्या मनातील ही भीती पूर्णपणे काढून टाकण्यात यशस्वी झाले आहेत.
- हृतिक रोशन व्हिडिओमध्ये असे म्हणताना ऐकू येत आहे की, जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती वाटते तेव्हा तुम्ही त्याच्या प्रेमात पडता.
- व्हिडीओमध्ये हृतिक आपल्या मुलाला प्रोत्साहन देताना आणि भीतीला खंबीरपणे तोंड देण्यास शिकवताना दिसत आहे.
व्हिडीओमध्ये हृतिक त्याचा मुलगा रिदानला पहिल्यांदा बंजी जंप करण्यास प्रवृत्त करत आहे. तर थ्रोबॅक व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे, “श्वास घे, तू तुझा वेळ घे, तुला दुखापत होणार नाही… तुला ५ सेकंदांपेक्षा कमी वेळ पडल्यासारखे वाटेल. तुमचा मेंदू इतका वेळ सहन करू शकतो. “आणि मला वाटतं तुम्ही ते करायला हवं कारण ते केल्यावर तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल. ते कसं करायचं ते तुम्हाला माहीत आहे. मनावर नियंत्रण कसं ठेवायचं हे तुम्हाला माहीत आहे.”