मुक्तपीठ टीम
प्रत्येक भारतीय नागरिकासाठी आधार कार्ड हे एक महत्त्वाचे कागदपत्र आहे. हे लक्षात घेऊन आधारकार्ड जारी करणारी संस्था युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजेच UIDAI वेळोवेळी अनेक सुविधा देत असते. आता UIDAI ने आता ISRO सोबत एक करार केला आहे. याचा थेट फायदा आधारकार्ड यूजर्सना तसंच इतरांनाही होणार आहे. एका क्लिकमध्ये आता भारतीय नागरिकांना आधार कार्ड केंद्र शोधणं शक्य होणार आहे.
- UIDAI ने लोकेशन ट्रॅक करण्यासाठी इस्रोसोबत करार केला आहे.
- युजर्स त्यांच्या घराजवळ आधार केंद्र शोधू शकतात.
- या करारानंतर, तुम्ही देशातील कोणत्याही भागात तुमच्या घरी बसून जवळच्या आधार केंद्राची माहिती सहज मिळवू शकता.
- आधारने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ट्विट केले आहे की NRSC, ISRO आणि UIDAI यांनी आधार कार्डचे केंद्र मिळवण्यासाठी संयुक्तपणे भुवन आधार पोर्टल सुरू केले आहे.
- या पोर्टलद्वारे तुम्ही आधार केंद्राची माहिती मिळवू शकता.
केंद्र शोधण्यासाठी हे नियम पाळा
- सर्वप्रथम https://bhuvan.nrsc.gov.in/aadhaar/ या अधिकृत वेबलाईटवर जावा.
- आधार केंद्राची माहिती मिळवण्यासाठी सेंटर निअरबाय या पर्यायावर क्लिक करा.
- येथे तुम्हाला केंद्राचे स्थान मिळेल.
- दुसरा मार्ग म्हणजे Search by Aadhaar Seva Kendra या पर्यायावर क्लिक करा.
- तुमच्या आधार केंद्राचे नाव तेथे टाका, त्यानंतर तुम्हाला केंद्राची माहिती मिळेल.
- याशिवाय पिन कोडद्वारे सर्च करून तुम्ही तुमच्या जवळच्या आधार केंद्राची माहिती देखील मिळवू शकाल.
- शेवटचा पर्याय म्हणजे राज्यनिहाय आधार सेवा केंद्राचा पर्याय निवडून राज्यातील सर्व आधार केंद्रांची माहिती मिळवणे.