मुक्तपीठ टीम
गेल्या काही दिवसांपासून राज्यात दोन वेळा दूधाच्या दरात वाढ झाली आहे. यामुळे सर्वच शेतकरी संघटना आक्रमक झाले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी देखील केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्ध विकास राज्यमंत्री संजीव बलियान यांची या मुद्द्यावरून दिल्लीत भेट घेतली. जागतिक स्पर्धेत दुग्ध व्यवसाय टिकवायचा असेल तर केंद्र सरकारनं राष्ट्रीय स्तरावर दुधाला हमीभाव जाहीर करण्याबाबत धोरण ठरवावं अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान दुधाला हमीभाव का आवश्यक आहे हे जाणून घेऊया.
दूध हमीभावाची गरज काय?
- जनावरांचा चारा, पशुखाद्य आणि औषधे खूप महाग झाली आहेत, तर त्या तुलनेत दुधाच्या किंमतीत वाढ झालेली नाही.
- अशा परिस्थितीत पशुपालन खूप महाग झाले आहे.
- दुधाच्या दरात वाढ झाली तरच या जोड व्यवसायाची शेतीला जोड देता येणार आहे.
- त्यामुळे गायीच्या दूधाला ४५ रुपये लिटर असा भाव मिळाला तरच या व्यवसायाचे गणित जुळणार आहे.
- सध्या गायीच्या दुधाला केवळ ३० ते ३२ रुपये लिटर दर मिळत आहे.
चारा किती महाग?
- दरवर्षी नव्हे तर सहा महिन्यातून एकादा कडब्याचे दर वाढत आहेत.
- गतवर्षी ६ ते ७ रुपयांना मिळणारी कडब्याची पेंडी यंदा १० रुपयांपर्यंत गेली आहे.
- अधिकचे उत्पादन मिळावे म्हणून कळणा, पेंड, सरकी यासारखे पशूखाद्य गरजेचे आहे.
- २० रुपये किलो असणारे हे पशूखाद्य आता ३८ रुपये किलोंवर गेले आहे.
- २०१६-१७ मध्ये करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून एका जनावरामागे शेतकऱ्यांना रोजचे ७ ते ५० रुपये मिळतात.
- शिवाय जनावरे दुभती असली तर अन्यथा त्यांच्या सांभाळण्याचाही खर्च यातून निघत नाही.
दुधाला किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणून दर निश्चित करावे….
- जनावरांच्या संगोपनावर होणारा खर्च पाहता जर डेअरी सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या दुधाच्या दरात वाढ केली नाही, तर मग लोक हे काम का करतील?
- खर्चानुसार सरकारने दुधाला किमान आधारभूत किमतीच्या कक्षेत आणून दर निश्चित करावी.
- खर्चावर ५०% नफा घेऊन किमान किंमत निश्चित करावी.
- अन्यथा अर्थव्यवस्थेत भरीव योगदान देणाऱ्या या दुग्धव्यवसाय क्षेत्राची स्थिती बिघडेल असे भारत डिघोळे यांनी सांगितले आहे.