मुक्तपीठ टीम
सुप्रसिद्ध अभिनेता धनुषने एक सणसणीत डायलॉग मारला आहे. तो अस्सल भारतीय हिरोला साजेसा आहे. धनुष हा नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे लोकांचे मनोरंजन करतो. कधी अभिनयातून, कधी व्हाय दीझ कोलावेरी गाऊन तर कधी रोमॅंटिक हिरो बनून. आताही धनुषने एका वेगळ्या प्रकारे आपली भूमिका मांडली आहे. नेटफ्लिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रसारित होणाऱ्या ‘द ग्रे मॅन’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात धनुष म्हणाला की, “सर्व भारतीय अभिनेत्यांना दक्षिण किंवा उत्तर भारतीय कलाकार न म्हणता भारतीय कलाकार म्हणावे” धनुषची ही भूमिका ही एक चांगलीच बातमी आहे!
ज्या वेळी दक्षिण भारतात बनलेले हिंदी चित्रपट बॉलिवूडमधील इतर चित्रपटांपेक्षा देशात जास्त आहे, अशा वेळी एखाद्या अभिनेत्याकडे त्याच्या प्रादेशिक अस्मितेकडे बघता कामा नये. दिग्दर्शक जोडी, जो रुसो आणि अँथनी रुसो यांच्या बहुप्रतिक्षित अॅक्शन चित्रपट “द ग्रे मॅन” यावर काम करत असलेला धनुष म्हणतो की, एकत्रित “भारतीय चित्रपट उद्योग” म्हणून चित्रपट निर्मितीसाठी प्रयत्न केले पाहिजेत.
दाक्षिणात्य भारतीय कलाकार म्हणणे म्हणजे बेइमानी!
- राष्ट्रीय पुरस्कार विजेता धनुषने म्हटले “सध्या मला किंवा इतर कोणत्याही अभिनेत्याला दक्षिण भारतीय कलाकार म्हणणे बेइमानी आहे.
- आपल्या सर्व अभिनेत्यांना दक्षिण भारतीय किंवा उत्तर भारतीय कलाकार म्हणून संबोधित न करता भारतीय कलाकार म्हणून संबोधले तर मला खूप आनंद होईल.
- मनोरंजन क्षेत्रात संपूर्ण जग एकाच व्यासपीठावर काम करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. यातून प्रेरणा घेतली पाहिजे.
आपण सर्वांनी एकत्र काम केल्यास छान होईल
धनुष म्हणाला, “आपण सर्वांनी एकत्र येऊन केवळ दक्षिण किंवा उत्तर भारतीय प्रेक्षकांसाठीच नाही तर सर्व लोकांसाठी चित्रपट बनवले तर खूप छान होईल. सध्या प्रत्येक चित्रपटांकडे भारतीय चित्रपट म्हणून पाहिले पाहिजे, विशेषत: जेव्हा प्रत्येकजण डिजिटल प्लॅटफॉर्मवर एकमेकांचे काम पाहू शकतो.”