मुक्तपीठ टीम
शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियात मॅनेजमेंट, फायनान्स, एचआर, लॉ, फायर अॅंड सिक्युरिटी, सिव्हील इंजिनीअरिंग आणि सीएस या क्षेत्रात असिस्टंट मॅनेजर पदासाठी एकूण ४६ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १६ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण मुंबई आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- मॅनेजमेंट असिस्टंट मॅनेजर – किमान ६०% गुणांसह यूजीसी/ एआयसीटीई मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून २ वर्षे पूर्णवेळ एमबीए/ व्यवसाय व्यवस्थापनातील पदव्युत्तर पदवी
- फायनान्स असिस्टंट मॅनेजर- चार्टर्ड अकाउंटंट/ कॉस्ट अकाउंटंट
- एचआर असिस्टंट मॅनेजर- १) २ वर्षे पूर्णवेळ एमबीए/ एमएमएस आणि कार्मिक मध्ये स्पेशलायझेशन
२) किमान ६० % गुणांसह व्यवस्थापन/एचआरडी/एचआरएम/औद्योगिक संबंध/कामगार कल्याण किंवा २ वर्षे पूर्णवेळ पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री/पर्सोनल मॅनेजमेंट इंडस्ट्रियल रिलेशनमध्ये डिप्लोमा/कामगार कल्याण/एचआरएम किंवा यूजीसी/एआयसीटीई मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कार्मिक व्यवस्थापनात मास्टर्स - लॉ असिस्टंट मॅनेजर- किमान ६०% गुणांसह मान्यताप्राप्त व्यक्तीकडून कायद्यातील पूर्णवेळ पदवी
- फायर अॅंड सिक्युरिटी असिस्टंट मॅनेजर- १) पूर्णवेळ बीई/ बीटेक २) किमान 60% गुणांसह एआयसीटीई मान्यताप्राप्त/ यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठातून अग्निशमन आणि सुरक्षा अभियांत्रिकी ३) पीसीयू/ पीएसबीएसमध्ये संबंधित अनुभव असलेल्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिले जाईल.
- सिव्हिल इंजिनीअर असिस्टंट मॅनेजर- ४ वर्षे पूर्णवेळ सिव्हिल इंजिनीअरिंगमध्ये पदवी
- सीएस असिस्टंट मॅनेजर- इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाचे सहयोगी/ फेलो सदस्यत्व असलेले पात्र कंपनी सचिव
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज पाठवण्याचा पत्ता
- m.kapil@sci.co.in
- श्री कपिल मिराखुर, एसएम फ्लीट कर्मचारी विभाग. द शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. ”शिपिंग हाऊस” ३रा मजला, २४५ मदन कामा रोड, मुंबई ४००२१
अधिक माहितीसाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.shipindia.com/ वरून माहिती मिळवू शकता.