तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रातील राजकीय सत्तासंघर्षाचा मराठी न्यूज चॅनल्सना चांगलाच फायदा झालेला दिसत आहे. मराठी न्यूज चॅनल्सच्या प्रेक्षक संख्येत या आठवड्यात दणदणीत वाढ झाली आहे. त्यातही १५ वर्षे वयावरील टार्गेट ग्रुपमध्ये पहिल्या क्रमाकांवरील टीव्ही ९ मराठीची प्रेक्षक संख्या ही ८ कोटींवर झेपावली आहे. त्यांच्या मागोमाग असलेल्या झी २४ तास हे चॅनल ७ कोटी २० लाखांवर पोहचले आहे. तसेच एबीपी माझा ५ कोटी ९० लाखांवर, साम ४ कोटींजवळ आणि न्यूज १८ लोकमतही ३ कोटी प्रेक्षकसंख्येवर आहेत. २+ टार्गेट समूहात हीच संख्या आणखी जास्त आहे.
किती मराठी प्रेक्षक कोणतं मराठी न्यूज चॅनल पाहतात?
(15+ TG) हा महत्वाचा लक्ष्य समूह आहे
- टीव्ही 9 मराठी – ८ कोटी
- झी २४ तास – ७ कोटी २० लाख
- एबीपी माझा – ५ कोटी ९० लाख
- साम – ३ कोटी ३० लाख
- न्यूज 18 लोकमत – ३ कोटी १० लाख
(2+ TG) हा लक्ष्य समूह तसा न्यूज चॅनल्ससाठी तेवढा महत्वाचा नसतो.
- टीव्ही 9 मराठी – ९ कोटी १५ लाख
- झी २४ तास – ८ कोटी ४४ लाख
- एबीपी माझा – ६ कोटी ६६ लाख
- साम – ३ कोटी ९० लाख
- न्यूज 18 लोकमत – ३ कोटी ५४ लाख
- या वर्षाच्या २८व्या आठवड्यात मार्केट शेअरमध्ये ०.३ टक्क्याची घट झाल्यानंतरही २९.१ टक्के मार्केट शेअरसह टीव्ही 9 मराठी नंबर १ आहे, दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तासचा मार्केट शेअर ०.५ ने वाढून २६.३वर आहे. एबीपी माझा ०.३ने कमी होत तिसऱ्या क्रमांकावर २१.३ टक्क्यांसह आहे. साम ०.१ची घट नोंदवत १२.२ टक्क्यांसह चौथ्या आणि न्यूज 18 लोकमत ०.२ ची वाढ नोंदवत ११.२ मार्केट शेअरसह पाचव्या क्रमांकावर आहे.
- सहाव्या क्रमांकावरील लोकशाहीने प्रक्षेपणाचे टेलीपोर्ट बदलल्यामुळे सध्या त्यांचे बार्क टीव्ही रेटिंग प्रसिद्ध केले जात नाही. ते लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे.
(खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु)
समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…
- मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
- एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
- झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
- सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
- या गुरुवारी वर्षातील २८ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
- ते रेटिंग २५, २६, २७ आणि २८ या चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
- याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
- चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
- या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.
(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)
(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)
खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:
टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता. नक्की पाहा:
टीआरपी घोटाळा मराठीत – टीआरपी आहे तरी काय?