मुक्तपीठ टीम
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ट्रेनी इंजिनीअर-१ आणि प्रोजेक्ट इंजिनीअर-१ या पदांसाठी एकूण १५० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०३ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण बंगळुरू आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- १) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स या विषयात बीई/ बीटेक २) ०६ महिने अनुभव
- पद क्र.२- १) इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स अॅंड टेलिकम्युनिकेशन/ टेलिकम्युनिकेशन/ कम्युनिकेशन/मेकॅनिकल/कॉम्प्युटर सायन्स या विषयात बीई/ बीटेक २) ०६ महिने अनुभव २) ०२ वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३२ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
पद क्र.१ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांकडून १७७ रूपये आकारले जाणार तर, पद क्र.२ साठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस वर्गातील उमेदवारांकडून ४७२ रूपये आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.bel-india.in/ वरून माहिती मिळवू शकता.