भातशेतीतील लावणीचं काम हे केवळ शेतकऱ्यांना भावतं असं नाही तर इतरांनाही ते करावंसं वाटतं. पावसाच्या पाण्यानं शेतातील मातीचा चिखल झालेला असतो. पण तो शहरातील नकोसा वाटणारा नसतो, तर गावाच्या शिवारातील हवाहवासा असा असतं. त्यात साचलेलं पाणी. त्यात मनमुराद लावणी करण्याच्या कामात एक वेगळीच गंमत असते. अगदी सेलिब्रिटींनाही त्याची भुरळ पडते. नुकतीच अभिनेत्री शहनाझ गिल ही अशाच एका भातशेतीत पोहचली. तिथं तिनं भाताच्या लावणीचा आनंद लुटला.