मुक्तपीठ टीम/ उदयराज वडामकर
कोल्हापूरमधील राधानगरी येथील राऊतवाडी धबधब्यावरील हुल्लडबाजी करणाऱ्यां पर्यटकाॆना चांगलाच पोलिसी प्रसाद मिळालाय. राशिवडे राऊतवाडी येथे पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या हुल्लडबाज तरुण पर्यटकावर पोलिसांनी दणकवत कारवाई केली. या हुल्लडबाजांकडून लाखोचा दंडही वसूल करण्यात आल्यानं त्यांना ती चांगलीच महागात पडली.
धबधब्याच्या कठड्यांवर जाऊन स्टंट करणाऱ्या हुल्लडबाजांना पोलिसांनी चोप दिला. राधानगरी येथील राऊतवाडी धबधब्यात तसेच तालुक्याच्या अन्य ठिकाणीही मद्यपी हुलबाज पर्यटकांमुळे सामान्यांना मोठा त्रास होतो. त्यातल्या त्यात महिलांना अशा मद्यधुंद हुल्लडबाज त्रास देतात. त्यांना पर्यटनाचा आनंदही लुटता येत नाही.
धबधब्याजवळ जीव घेणे स्टंट करणे, गाडी वरुन ट्रिपल सीट, दंगा करणे, कर्णकर्कश हॉर्न वाजवणे अशा प्रकारे हुल्लडबाज पर्यटकाकडून त्रास दिला जातो.
अशा हुल्लडबाज पर्यटकांना विनंती करणाऱ्या पोलिसांनाच मद्यपी पर्यटकाकडून शिवीगाळीचे प्रकार घडले होते. त्यामुळे कोल्हापूरच्या वरिष्ठ अधिकारी यांचे आदेशानुसार स्थानिक पोलिसांनी कारवाई केली.