मुक्तपीठ टीम
भारतीय पुरुषांपेक्षा महिलांमध्ये स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची इच्छा जास्त आहे. कोरोना संकटात नोकऱ्या जात असताना अनेक महिलांनी स्वत:चे व्यवसाय सुरु केले आणि इतर महिलांनाही रोजगार उपलब्ध करून दिला. लिंक्डइनवर यूजर्सनी दिलेल्या माहितीचं विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. लिंक्डइनचे देशभरात ८८ दशलक्ष यूजर्स आहेत, तर त्यांची संख्या जगभरात ८३ दशलक्ष आहे.
स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा महिलांमध्ये वाढता कल- लिंक्डइन
- लिंक्डइन डेटानुसार, २०१६ ते २०२१ दरम्यान स्टार्टअपच्या महिला संस्थापकांचा वाटा २.६८ पटीने वाढला आहे.
- या तुलनेत स्टार्टअप्सच्या पुरुष संस्थापकांचा वाटा केवळ १.७९ पट वाढला आहे.
- २०२० आणि २०२१ मध्ये महिला उद्योजकतेचा वाढीचा दर सर्वाधिक असल्याचे अहवालात म्हटले आहे.
- कर्मचारी कामगार वर्गात उच्च पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व जवळजवळ १८ टक्के केले जाते.
उच्च पदांवर महिला फारच कमी
- कंपन्यांमध्ये अंतर्गत स्तरावर महिलांना पुरुषांप्रमाणे प्रमोशन मिळत नाही.
- आकडेवारी दर्शवते की, महिलांच्या तुलनेत पुरुषांना सर्वोच्च पदावर बढती मिळण्याची शक्यता ४२ टक्के जास्त आहे.
- या अहवालानुसार, भारतातील व्यवस्थापकीय पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व २९ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर आले आहे.