मुक्तपीठ टीम
भारताच्या कोरोनाविरोधी लसयुद्धात महत्वाचा आणि मोठा विक्रम झाला आहे. खरंतर हा महाविक्रम आहे. आज भारताने २०० कोटी लसींच्या डोसचा टप्पा सर केला. आज सकाळच्या तात्पुरत्या अहवालानुसार भारताच्या देशव्यापी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने १९९.९८ कोटी (1,99,98,89,097) मात्रांचा टप्पा पार केला. 2,63,22,345 सत्रांमधून लसीकरणचा हा टप्पा गाठण्यात आला आहे. याचा अर्थ आतापर्यंत देशात २०० कोटी डोसचा आकडा गाठला गेला असेल.
History has been created again! India surpasses the milestone of #200CroreVaccinations today. Under the guidance of Hon. PM @narendramodi India is leading the global fight against Covid-19.
Congratulations to our healthcare workers & frontline warriors led by @mansukhmandviya Ji. pic.twitter.com/XfUD6N6gpR— Jagat Prakash Nadda (@JPNadda) July 17, 2022
देशातील १२ ते १४ वर्षे वयोगटातील मुला मुलींकरिता कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम १६ मार्च २०२२ रोजी सुरू झाली. आतापर्यंत ३.७९ कोटीहून जास्त (3,79,82,251) किशोरवयीन बालकांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. त्याचप्रमाणे १० एप्रिल २०२२ पासून १८ ते ५९ वयोगटातल्या नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक क्षमता वृद्धी मात्रा देण्यास प्रारंभ झाला आहे.
Yes it’s #200CroreVaccinations
Congratulations India!
Thank you Hon PM @narendramodi ji for this historic achievement.
India achieves 2 billion #Covid19 vaccination mark!
Congratulations, every healthcare person for exemplary service & contribution 🙏#SabkaSath & #SabkaPrayas! pic.twitter.com/WHYs1a8R9B— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 17, 2022
आज सकाळी ७ वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार एकूण मात्रांची गटनिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे:
Cumulative Vaccine Dose Coverage | ||
HCWs | 1st Dose | 1,04,10,322 |
2nd Dose | 1,00,79,660 | |
Precaution Dose | 60,21,211 | |
FLWs | 1st Dose | 1,84,27,518 |
2nd Dose | 1,76,52,093 | |
Precaution Dose | 1,14,59,871 | |
Age Group 12-14 years | 1st Dose | 3,79,82,251 |
2nd Dose | 2,62,02,322 | |
Age Group 15-18 years | 1st Dose | 6,08,43,400 |
2nd Dose | 5,01,13,916 | |
Age Group 18-44 years | 1st Dose | 55,88,87,272 |
2nd Dose | 50,58,64,044 | |
Precaution Dose | 62,19,363 | |
Age Group 45-59 years | 1st Dose | 20,35,68,118 |
2nd Dose | 19,45,59,339 | |
Precaution Dose | 45,13,607 | |
Over 60 years | 1st Dose | 12,73,60,055 |
2nd Dose | 12,15,70,899 | |
Precaution Dose | 2,81,53,836 | |
Precaution Dose | 5,63,67,888 | |
Total | 1,99,98,89,097 |
भारतातील उपचाराधीन रुग्णसंख्या सध्या १,४३,४४९ इतकी आहे, ती देशाच्या एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत ०.३३% इतकी आहे.
परिणामी, देशात रुग्ण बरे होण्याचा दर ९८.४% झाला आहे. गेल्या २४ तासात १७,७९० कोरोना रुग्ण बरे झाल्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या (महामारीच्या आरंभापासून ) वाढून ४,३०,८१,४४१ झाली आहे.
गेल्या २४ तासात २०,५२८ नवे रुग्ण आढळले.
गेल्या २४ तासात एकूण ३.९२,५६९ चाचण्या करण्यात आल्या. भारताने आतापर्यंत एकूण ८६.९४ कोटींहून अधिक (86,94,25,632) चाचण्या केल्या आहेत.