मुक्तपीठ टीम
ब्रिटिशांनी मिठावर कर आकारल्यानंतर भारतातून ब्रिटिशांची राजवट संपण्याची सुरुवात झाली होती, आता भाजपा सरकारने अन्नधान्यावर जीएसटी आकारल्याने त्याच इतिहासाची पुनरावृत्ती होणार असे दिसते असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला.
पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल यांच्यासह स्टील, सिमेंटच्या दरवाढीने सामान्य माणसाचे कंबरडे मोडले आहे. हे कमी म्हणून की काय आता केंद्रातील भाजप सरकारने विविध जीवनावश्यक वस्तूनंतर आता अन्नधान्यावर देखील पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय घेतला आहे याबाबत जयंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आधीच खते, कपडे, कोळसा, जीवनावश्यक औषधे आदी वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लावल्याने नागरिकांची पाठ मोडून गेली आहे, त्यात आता अन्नधान्यावर जीएसटी लावल्याने नागरिकांच्या पोटावरदेखील पाय मारण्याचा मोदी सरकारचा हा प्रयत्न आहे असा संतापही जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये व्यक्त केला आहे.