मुक्तपीठ टीम
सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियात आयटी क्षेत्रात ऑफिसर ग्रेड ए असिस्टंट मॅनेजर या पदावर एकूण २४ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. या बातमीविषयी अधिक माहितीसाठी व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली संबंधित बातमीची लिंक क्लिक करा आणि मुक्तपीठच्या वेबसाइटला भेट द्या.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन/ आयटी इंजिनीअरिंग पदवी किंवा कोणत्याही शाखेतील पदवीसह पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ३० वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १ हजार रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अधिक माहितीसाठी सिक्युरिटीज अॅंड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.sebi.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.