Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वेस्टर्न ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाची उपमुख्यमंत्री फडणवीसांशी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत चर्चा 

July 15, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
मा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाने घेतली भेट 1

मुक्तपीठ टीम

महाराष्ट्रात परदेशी गुंतवणुकीसाठी अमाप संधी आहेत. ऑस्ट्रेलिया- महाराष्ट्र शासन यांच्यामध्ये पर्यटन, व्यापार, कृषी, ऊर्जा संक्रमण, शिक्षण, तंत्रज्ञान सेवा आणि कृषी-अन्न प्रक्रिया तसेच पर्यावरण इ. क्षेत्रांतील गुंतवणूकीसाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे डेप्युटी प्रिमियर आणि राज्य विकास, व्यापार आणि पर्यटन मंत्री रोजर कुक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने मंत्रालयात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी भारतीय वंशाचे ज्येष्ठ संसद सदस्य येझ मुबारकई, डेप्युटी प्रिमियरचे चीफ ऑफ स्टाफ नील फर्गस, कौन्सुल – जनरल मुंबई, पीटर ट्रुसवेल, पर्यटन, विज्ञान आणि नवोपक्रम विभागाच्या महासंचालक रेबेका ब्राउन, ऑस्ट्रेलियन डेप्युटी कॉन्सुल-जनरल मायकेल ब्राउन, यांसह अतिरिक्त मुख्य सचिव बलदेव सिंह, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता  विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुख्य कार्यकारी अधिकारी (एमआयडीसी) डॉ. पी. अनबलगन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव श्रीकर परदेशी, प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी राजेश गवांडे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे भारताचे पॉवर हाऊस आहे. देशाच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात  महाराष्ट्राचा मोठा हिस्सा आहे. येथे विविध क्षेत्रासाठी चांगले वातावरण असून पायाभूत सोयी – सुविधाही  मोठ्या प्रमाणावर आहेत. महाराष्ट्र हे आगामी काही वर्षात कृषीसंपन्न राज्य व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. त्यामुळे कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान या विषयात काम करण्यास अधिक संधी असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Australian delegation met Deputy Chief Minister Devendra Fadnavis

सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यात विकेंद्रित सौर  वीज निर्मितीचे उद्दिष्ट आहे. किमान ३० टक्के फिडर यावर्षी सौर उर्जेवर जातील, या दृष्टीने प्रयत्न सुरु आहेत. या क्षेत्रात देखील सहकार्य करावे तसेच कोळशाचे वायुकरण या क्षेत्रात देखील काम करण्यासाठी संधी असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. महाराष्ट्र शासन आगामी काळात विविध विभागांतर्गत उपलब्ध असलेल्या संधी लक्षात घेऊन एक सर्वसमावेशक धोरण निश्चित करेल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी रोजर कुक यांनी सांगितले, वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने महाराष्ट्रात विविध क्षेत्रात गुंतवणूक केली आहे.  शेती व्यवसाय, पायाभूत सुविधा आणि पर्यावरण या क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी व काम करण्यासाठी  तसेच आगामी काळात महाराष्ट्र व वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्यात विविध क्षेत्रात सामंजस्य करार करण्यात येतील. महाराष्ट्र हे औद्योगिक दृष्ट्या प्रगत राज्य आहे. महाराष्ट्राशी आम्हाला मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करायचे आहेत, असेही ते यावेळी म्हणाले. ज्येष्ठ संसद सदस्य येझ मुबारकई यांनी ऑस्ट्रेलियातील भारतीयांचे योगदान आणि असलेल्या विविध संधी याबाबत माहिती दिली.


Tags: Deputy CM FadnavisMaharashtra Various Sector InvestmentmuktpeethWestern Australian Delegationउपमुख्यमंत्री फडणवीसघडलं-बिघडलंमहाराष्ट्र विविध क्षेत्र गुंतवणुकमुक्तपीठवेस्टर्न ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळ
Previous Post

इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा आता २० जुलै ऐवजी ३१ जुलै रोजी  

Next Post

इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन

Next Post
Maharashtra Governor releases biography of ISKCON Founder Srila Prabhupada

इस्कॉनचे संस्थापक प्रभुपाद यांच्या जीवनकार्यावरील पुस्तकाचे राजभवन येथे प्रकाशन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!