मुक्तपीठ टीम
खासदारांच्या जिभेला आवर घालण्यासाठी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये शब्दांच्या वापराबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहे. आता लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांच्या कामकाजादरम्यान सदस्यांना जुमलाजीवी, हुकूमशाही, नौटंकी, अल्पबुद्धी खासदार, शकुनी, जयचंद, चांडाळ चौकडी, पिठ्ठू आणि लॉलिपॉप अशासारखे शब्द बोलता येणार नाहीत. चर्चेत सहभागी होताना अशा शब्दांचा वापर अयोग्य वर्तन मानला जाईल आणि ते सभागृहाच्या कामकाजाच्या रेकॉर्डमधूनही काढले जातील.
लोकसभा सचिवालयाने जारी केली असंसदीय शब्दांची यादी!
- लोकसभा सचिवालयाने असंसदीय शब्द २०२१ या शीर्षकाखाली अशा शब्द आणि वाक्यांचे एक नवीन संकलन तयार केले आहे, ज्यांना ‘असंसदीय अभिव्यक्ती’ श्रेणीत ठेवण्यात आले आहे.
- संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सदस्यांच्या वापरासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या या यादीत लोकसभा, राज्यसभा आणि राज्य विधिमंडळांमध्ये २०२१ मध्ये असंसदीय घोषित करण्यात आलेल्या शब्दांचा किंवा वाक्यांचा समावेश आहे.
हे शब्द बोलण्यास बंदी
- हरामी
- काळे सत्र
- दलाल
- रक्ताची शेती
- चिलम घेणे
- छोकरा
- कोळसा चोर
- गोरू चोर
- चरस पिणे
- बैल
असे शब्द बोलण्यास बंदी घालण्यात आली आहे..
अध्यक्ष किंवा सभारतींवरील आक्षेपाबाबत अनेक वाक्येही असंसदीय अभिव्यक्तीच्या श्रेणीत ठेवण्यात आली आहेत.
यामध्ये ‘तुम्ही माझा वेळ वाया घालवत आहात, तुम्ही आमचा गळा दाबता आहात, अध्यक्ष, सभापती कमकुवत झाले आहे आणि हे अध्यक्, सभापती आपल्या सदस्यांचे रक्षण करण्यास असमर्थ आहे’ वगैरे वाक्य आता चालणार नाहीत.
शब्दसंग्रहातील इंग्रजी शब्दांवर बंधने
या संकलनात काही इंग्रजी शब्द आणि वाक्यांचाही समावेश करण्यात आला आहे:
- ‘आय विल कर्स यू’
- बिटन विथ शू
- बिट्रेड
- ब्लडशेड
- चिटेड
- शेडिंग क्रोकोडाइल टीअर्स
- डॉन्की
- गून्स
- माफिया
- रबिश
- स्नेक चार्मर
- टाउट
- ट्रेटर
- विच डॉक्टर
खासदारांनी सभागृहात असे शब्द वापरल्यास, अध्यक्ष किंवा सभापतींच्या आदेशाने रेकॉर्ड किंवा कार्यवाहीतून बाहेर काढले जातात.
राज्यांच्या विधानसभांमधील असंसदीय शब्दांनाही टाळले!
राज्यांच्या विधानसभांच्या कामकाजात समाविष्ट नसलेले काही शब्द किंवा वाक्ये देखील संसदीय कामकाजात टाळण्यात आले आहेत.
- बॉब कट हेअर
- गरियाना – शिवीगाळ
- अंट-शंट – उलट-सुलट
- उच्चके – लबाड
- उल्टा चोर कोतवाल को डांटे – चोराच्या उलट्या बोंबा
- काव काव करणे
- तळवे चाटणे
- तडीपार
- तुर्रम खान – टिकोजीराव
- घाट घाट पर पाणी पिना
- ठेंगा दाखवला, या शब्दांचाही समावेश आहे.
अध्यक्ष-सभापतींना सुनावणंही नको!
जर एखाद्या सदस्याने अध्यक्ष किंवा सभापतींवर आक्षेप घेत, ‘तुम्ही फक्त सदस्य असताना असे ओरडत वेलमध्ये जायचा ते आठवू की तुम्ही आज खुर्चीवर बसलात तेव्हाची ही वेळ आठवू’ असं म्हटलं तरी चालणार नाही.