मुक्तपीठ टीम
रॉयल एनफिल्ड कंपनी आपल्या आकर्षक बाईक्स आणि फिचर्ससाठी नेहमीच चर्चेत असते. आताही असेच काहीसे घडले आहे. जर तुमच्याकडे रॉयल एनफिल्ड बाईक असेल किंवा नवीन रॉयल एनफिल्ड बाईक घेण्याचा विचार करत असाल, तर ही माहिती उपयोगी ठरू शकते. रॉयल एनफिल्डने अलीकडेच देशभरात आपली डिजिटल रोड साइड असिस्टेंस सर्व्हिस सुरू केली आहे. कंपनीच्या निवडक बाइक्सचे मालक या सर्व्हिसचा लाभ घेऊ शकतील. बुलेट, क्लासिक, मेटियर, इलेक्ट्रा, ६५० ट्विन्स आणि हिमालयनसारख्या बाइक्सच्या मालकांना रस्त्याच्या कडेला ही सर्व्हिस मिळू शकते.
रोड साइड असिस्टेंस सर्व्हिसचा लाभ कसा घ्यावा?
- जर, रॉयल एनफिल्ड बाईक कुठेतरी बाहेर घेऊन गेल्यास आणि त्यात रस्त्यावर काही अडचणी किंवा बिघाड झाल्यास, रॉयल एनफिल्डकडून रस्त्याच्या कडेला मदतीसाठी विनंती करू शकता.
- मदतीसाठी रॉयल एनफील्ड अॅप वापरावे लागेल.
- विनंती केल्यानंतर, कंपनी त्या ठिकाणी मेकॅनिक पाठवेल.
- जर तुमची बाईक खूप खराब असेल तर ती सर्व्हिस सेंटरमध्ये नेली जाईल आणि जर छोटी समस्या असेल तर मेकॅनिक तिथे बाइक दुरुस्त करेल.
घरी बसल्याही सर्व्हिसचा लाभ घेता येणार
ही सेवा घेतल्यानंतर दुचाकी मालकांना या सेवेचा लाभ केवळ बाहेर किंवा महामार्गावरच नाही तर घरी बसूनही घेता येणार आहे. या सेवेचा लाभ घेतल्यानंतर, बाईक मालकांना त्यांच्या बाइकची २ वेळा घरी बसून सर्व्हिसिंग करता येणार आहे.
रॉयल एनफिल्डने एका बाजूने सुरू केलेल्या या सर्व्हिसमुळे, सर्व कामगार शुल्क आणि प्रवास खर्च कंपनी उचलेल. मात्र, बाईकमध्ये नवीन पार्ट बसवल्यास त्याचा खर्च बाइकच्या मालकाला द्यावा लागणार आहे. जर नवीन रॉयल एनफिल्ड बाईक खरेदी केली असेल तर ही सेवा कंपनीकडून मोफत दिली जाईल आणि जर बाईक ३ वर्ष जुनी असेल तर ८०० रुपये द्यावे लागतील आणि जर बाईक ५ वर्ष जुनी असेल तर, १ हजार रुपये भरावे लागतील.