मुक्तपीठ टीम
ट्विटर हे सध्याचे जागतिक घडामोडींसाठी सुप्रसिद्ध असणारे ट्रेंडिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. आता कोणत्याही व्यक्तीसोबत मिळून एकत्र ट्विट करण्याची संधी याद्वारे मिळणार आहे. ट्विटर लवकरच आपल्या यूजर्सना हे खास फीचर देणार आहे. ट्विटरने या नवीन फिचरची चाचणी सुरू केली आहे सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, हे फिचर दोन यूजर्सना एक ट्विट पोस्ट करण्यास सक्षम करेल. तुम्ही तुमच्या मित्रासोबत फक्त एकच ट्विट करू शकाल. ट्विटरने स्वतःच पुष्टी केली की त्यांनी ‘को-ट्वीट’ नावाच्या नवीन फिचर्ससह प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे जी “दोन ट्विटर्सना स्पॉटलाइट सामायिक करण्यास, त्यांचे योगदान प्रदर्शित करण्यास आणि अधिक लोकांशी कनेक्ट होण्यास सक्षम करेल.”
हे को-ट्विट फिचर क्रिएटर्स आणि ब्रँडसाठी आहे ज्यांना प्लॅटफॉर्मवरील कंटेंट आणि मोहिमांमध्ये सहयोग करायचे आहे आणि ते इंस्टाग्रामवर उपलब्ध कोलॅबरेशन फीचरसारखे आहे. ट्विटरच्या को-ट्विट फिचरची या वर्षी एप्रिलमध्ये अॅप संशोधक अलेसेंड्रो पलुझी यांनी दखल घेतली होती आणि आता, कंपनीने या फिचरची अधिकृतपणे पुष्टी केली आहे.
को-ट्विट फिचर म्हणजे काय?
- को-ट्विट फिचर जे लेखकांच्या प्रोफाइल आणि त्यांच्या फॉलोअर्सच्या टाइमलाइनवर एकाच वेळी पोस्ट केले जाते.
- ट्विटर यूजर्स हेडरमध्ये दोन लेखकांचे प्रोफाइल फोटो आणि यूजर्सनावे पाहता तेव्हा ते को-ट्विट ओळखू शकतात.
- एका वेळी फक्त दोन यूजर्स को-ट्विटमध्ये ट्विट करू शकतात.
को-ट्विट फिचर कसे कार्य करते?
- ट्विटरचे को-ट्विट वैशिष्ट्य वापरण्यास सोपे आहे.
- एकदा दोन लेखकांनी ट्विटचे कंटेंट ठरवले की, एका लेखकाने को-ट्विट करणे आणि को-ऑथरला इनव्हाइट करणे आवश्यक आहे.
- जेव्हा को-ऑथर को-ट्विट इनव्हाइट स्वीकारतो, तेव्हा को-ट्विट ते प्रत्येक ऑथरच्या प्रोफाइलवर आणि त्यांच्या दोन्ही फॉलोअर्सच्या टाइमलाइनवर लगेच पोस्ट करते.
- हे लक्षात घेण्यासारखे आहे की को-ट्विट ट्विट पाठवल्यानंतर को-ट्विटचा कंटेंट एडिट किंवा अॅडजस्ट केली जाऊ शकत नाही.
- तसेच, ट्विटर यूजर्स मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर फॉलो करणाऱ्या आणि सार्वजनिक अकाउंट असलेल्या लोकांना को-ट्विट इनव्हाइट पाठवू शकतो.
ट्विटरने म्हटले आहे की, त्याचे को-ट्विट फिचर कॅनडा, कोरिया आणि अमेरिकेमधील निवडक अकाउंट्ससाठी उपलब्ध असेल. कंपनीने असा इशारा देखील दिला आहे की, “या प्रयोगाच्या शेवटी, आम्ही हे फिचर बंद करू शकतो आणि तयार केलेले कोणतेही को-ट्विट काढून टाकले जाऊ शकतात.” याचा अर्थ असा आहे की हे फिचर त्याच्या मोठ्या यूजर्ससाठी सादर करण्याची ट्विटरची योजना अनिश्चित आहे.