तरुणाईच्या संशोधक वृत्तीला जर उपयोगीपणाची दिशा दिली तर समाजातील सामान्यांचं भलं होणं नक्की असतं. सांगली जिल्ह्यातील आर.आय.टी.च्या अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी लावलेला बैलगाडीसाठीचा रोलिंग सपोर्ट असाच एक समाजोपयोगी शोध आहे. आर.आय.टी.च्या विद्यार्थ्यांनी ऊस वाहतूक करणाऱ्या बैलगाडीसाठी रोलिंग सर्पोट साधन तयार केलंय.