उदयराज वडामकर
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ४१ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच राधानगरी धरणात ११९.१५ दलघमी पाणीसाठा आहे. आजच्या अहवालानुसार राधानगरी धरणातून १३५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, सरकारी कोगे व राशिवडे, कासारी नदीवरील- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव व पेंडाखळे, कडवी नदी- भोसलेवाडी, येलूर, कोपार्डे, सवते सावर्डे, शिरगांव व सरुड पाटणे, वेधगंगा नदीवरील -कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण व वाघापूर, घटप्रभा नदीवरील- कानर्डे सावर्डे, पिळणी व बिजूर भोगोली, वारणा नदीवरील- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदूळवाडी व शिगांव, दुधगंगा नदीवरील- दत्तवाड व सुळकुड, कुंभी नदीवरील- शेणवडे व कळे, तुळशी नदीवरील- बीड व असे ४१ बंधारे पाण्याखाली आहे.
कोल्हापुर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे.
- तुळशी ४८.१२ दलघमी,
- वारणा ४७२.९५ दलघमी,
- दूधगंगा २९५.१३ दलघमी,
- कासारी ४६.१६ दलघमी,
- कडवी ३५.११ दलघमी,
- कुंभी ४१.७५ दलघमी,
- पाटगाव ५४.२६ दलघमी,
- चिकोत्रा २२.३० दलघमी,
- चित्री २२.८९ दलघमी,
- जंगमहट्टी १८.०४ दलघमी,
- घटप्रभा ४४.१७ दलघमी,
- जांबरे २३.२३ दलघमी,
- आंबेआहोळ २१.८४,
- कोदे -(६.०६)
- लघु प्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे.
- राजाराम ३२,७ फूट,
- सुर्वे ३१.१ फूट,
- रुई ६०.९ फूट,
- इचलकरंजी ५६.६ फूट,
- तेरवाड ४९.१० फूट,
- शिरोळ ३९ फूट,
- नृसिंहवाडी ३५.९ फूट,
- राजापूर २५.६ फूट तर नजीकच्या सांगली १०.९ फूट व अंकली १४.४ फूट अशी आहे.
- आज दिवसभर पाऊस संततधार सुरू आहे.