मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तारााआधीच सत्ताधारी पक्षांमध्ये वाद समोर येत आहेत. रामटेकचे अपक्ष आमदार आशीष जयस्वाल मंत्रिपद देण्यास भाजपाने आणि मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांना रिपाईचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी विरोध दर्शविला आहे. शिवसेनेत असताना काही आमदारांची ईडी चौकशी सुरु असल्याने त्यांनी भाजपाशी मैत्रीचा मार्ग पत्करला असा आरोप होतो, मात्र आता भाजपाने शिवसेनेची संगत सोडून एकनाथ शिंदेंसोबत आलेल्या आमदार जयस्वालांच्या ईडी चौकशीची मागणी नव्याने केली आहे.
मनसेला मंत्रीपद देण्यात रामदास आठवलेंचा विरोध!!
- रविवारी कल्याणमधील अत्रे रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमात रामदास आठवले बोलत होते.
- या कार्यक्रमात रामदास आठवले यांनी ‘रिपाई’ला शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एखादे मंत्रीपद मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
- तसेच मनसेला मंत्रिपद देण्यास त्यांनी विरोध दर्शविला आहे.
- मनसेचा सत्ता स्थापनेत काही संबंध नाही.
- त्यामुळे मनसेला मंत्री पद देण्याचा प्रश्न येत नाही.
- तसा विचार जर होत असेल तर आमचा विरोध असेल, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सांगितले.
भाजपाला जयस्वाल नको!!
- सेना बंडखोर आमदारांच्या गटात सर्वांत शेवटी सहभागी होणारे आशीष जयस्वाल यांनी २०१९च्या निवडणुकीत भाजप-सेना युती असतानाही भाजपा उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
- त्या निवडणुकीत जयस्वाल यांनी भाजपा उमेदवाराचा पराभव केला. त्यामुळे त्यांच्याविरोधात स्थानिक भाजपा नेत्यांचा राग आहे.
आमदार जयस्वालांवर भाजपाचे गंभीर आरोप
- आमदार आशिष जयस्वाल रामटेक तालुक्यातील खनिज संपत्तीची लूट करतात.
- खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना तब्बल १५० कोटींचा गैरव्यवहार केला.
- यापूर्वीसुद्धा कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आ. जयस्वालांवर ३०० कोटींचा गैरव्यवहाराचा आरोप केला. त्यावरून चौकशीस सुरवातही झाली होती.
- परंतु, तत्कालिन मुख्यमंत्री ठाकरे यांनी ती चौकशी बंद केली
- तसेच, शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जयस्वाल यांच्या मर्जीतील लोकांनी धान खरेदी केंद्र उघडून राज्यातील नव्हे तर मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातील शेतकऱ्यांकडून आयात केलेले धान्य खरेदी केले.
ईडीकडून चौकशी करा
- आ. जयस्वाल यांनी मोठा गैरव्यवहार करून कोट्यवधीची जमीन विकत घेतली आहे.
- त्यांनी नातेवाईकांच्या नावाने संपत्ती घेतली आहे.
- त्यामुळे जयस्वाल यांची ईडी आणि सीबीआयनेही चौकशी करण्यात यावी.
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आ. जयस्वाल यांनी केलेल्या भ्रष्टाराची सर्व कागदपत्रे पुराव्यासह पाठवून त्यांनी सरकारमध्ये मंत्रीपद देऊ नये, अशी मागणी करणार आहे.