मुक्तपीठ टीम
नांदेड-हिंगोली जिल्ह्यात शनिवारी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला. नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे शेतात- घरात पाणी शिरलं आहे. यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा तिबार पेरणीचे संकट उभं राहिलं आहे. हिंगोली जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने आनसा नदीला पूर आला. नदीला पूर आल्याने कुरुंदा गाव अख्खं पाण्याखाली गेलं आहे. याबाबतची माहिती मिळताच, दिल्ली दौऱ्यावर असलेले एकनाथ शिंदे यांनी येथील पूरस्थितीचा आढावा घेत हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधला. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची-राहाण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री @mieknathshinde हे दिल्ली दौऱ्यावर असून #हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला आलेल्या पूराबाबतच्या सद्यस्थितीची माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून भ्रमणध्वनीद्वारे घेतली.पूरग्रस्तांची सर्व व्यवस्था करावी तसेच कोणतीही जीवितहानी होणार नाही यास प्राधान्य देण्याचे निर्देश त्यांनी दिले. pic.twitter.com/nUEbPkqr0x
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) July 9, 2022
हिंगोली जिल्ह्यात अनेक गावकरी घराच्या छतावर!!
- हिंगोली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने कोसळत आहे.
- अनेक भागातील नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत.
- वसमत तालुक्यातल्या कुरुंदा परिसरात मध्यरात्री ४ ते ५ वाजताच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
- ढगफुटी सदृश्य झालेल्या पावसाने कुरुंदा गावातील घरांमध्ये पाणी शिरल आहे.
- घराच्या छतावर गावकऱ्यांनी आपला जीव मुठीत धरून रात्र जागून काढली.
- गावात नदीकाठची काही घरं पाण्याखाली सुद्धा गेली होती.
- उद्भवलेल्या पूर परिस्थितीमुळे अनेक घरांच्या भिंतीची पडझड झाली आहे.
- तसेच घरातील जीवनावश्यक वस्तूसह इतर साहित्यांचा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे.
- सोबतच शेतातील पीकं सुद्धा पाण्याखाली गेल्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे.
नांदेडमध्ये अनेक गावांचा संपर्क तुटला!
- नांदेडमध्ये आसना नदीला पूर आल्याने नांडेद-परभणी वाहतूक ठप्प झाली आहे.
- मूळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचलं.
- घरांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून नुकसान झाले आहे.
- अजूनही पाऊस सुरु असल्याने पाणी वाढतच आहे.
- पाणी साचल्याने अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे.
- पुराच्या पाण्यामुळे पिकासह शेतीही पाण्याखाली गेली आहे.
- अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दिल्लीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पूरस्थितीचा आढावा!!
- हिंगोली जिल्ह्यातील आसना नदीला पूर आल्यामुळे कुरुंदा गाव पाण्याखाली गेले आहे.
- दिल्ली दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब कळताच त्यांनी स्वतः दिल्लीवरून हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून आढावा घेतला.
- पूरग्रस्त नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या जेवणाची- राहण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
- तसेच पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची लवकरात लवकर सुटका करण्यासाठी एनडीआरएफ पथके पाठवण्याची सूचना केली.
- काही कमी जास्त लागल्यास स्वतः कळवावे, असेही निर्देश त्यांना दिले.