मुक्तपीठ टीम
शारीरिक आणि मानसिक दिव्यांगांकरिता त्यांचे अधिकार आणि सन्मान मिळवून देण्यासाठी गेली १२ वर्षे अविरत कार्यरत असलेली ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’ (एनजीएफ) ही मुंबईतील प्रख्यात संस्था आहे. या संस्थेचा येत्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सातवा भव्य “राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार – २०२२” च्या सोहळ्यासाठी इच्छुकांनी आपल्या प्रवेशिका सादर कराव्यात असे आवाहन ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’च्या अध्यक्षा सौ. नूतन गुळगुळे यांनी केले आहे. पुरस्कारांसाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे.
विविध भाषा – परंपरा आणि संस्कृती असलेल्या भारतातील आपल्या अनेक राज्यांतील दिव्यांगांकडून नामांकनांसाठी गेली सहा वर्षे प्रवेशिका प्राप्त होतात, कोविड काळातही या पुरस्कारांसाठी देशातून दिव्यांगांनी उल्लेखनीय प्रतिसाद दिल्याने या वर्षी अधिक उत्साहाने हा भव्य सोहळा आम्ही करणार असल्याचे त्या म्हणाल्या. अध्यक्षा, नूतन गुळगुळे, संस्थेचे सल्लागार समिती अध्यक्ष जेष्ठ कर्करोग तद्न्य डॉ. संजय दुधाट, अमरनाथ तेंडूलकर, पुष्कर, विनायक गुळगुळे यांनी प्रवेशिका सादर करण्याबाबत आवाहन केले आहे. मानपत्र, रोख रक्कम, आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरवमूर्तींचा सन्मान ‘नूतन गुळगुळे फाउंडेशन’च्या या ‘राष्ट्रीय ध्येयपूर्ती पुरस्कार’ सोहळ्यात केला जातो.