Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गृहनिर्माण सोसायटीच्या निवडणूक खर्चात कपात, १०० सदस्यांपर्यंत ७,५०० रूपये, बिनविरोध निवडणुकीसाठी ३,५०० रूपये!

भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांची मागणी मान्य

July 8, 2022
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
BJP MLA Adv. Ashish Shelar

मुक्तपीठ टीम

भाजपा- शिवसेना युतीचे सरकार येताच गृहनिर्माण सोसायट्यांना मोठा दिलासा देण्यात आला असून सोसायटीच्या निवडणूक खर्चात मोठी कपात करण्यात आली आहे. सहकार विभागाने महाराष्ट्र सहकारी संस्था उपविधी १९६० कलम ७३ खंड B&C (११) मधील बदलांनुसार २५० पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणूका घेण्यासाठी ३४० शासनमान्य व्यक्तींच्या पॅनेलमधून निवडणूक निरीक्षक नियुक्त करुन निवडणूका करण्याचे निर्देश शासनाने दिले होते.

गृहनिर्माण सोसायटीच्या विशेषत: लहान सोसायटय़ांवर  अशा निवडणुकांचा खर्चाचा अतिरिक्त बोजा पडू नये, यासाठी  ही बाब आमदार अँड.आशिष शेलार गेले वर्षेभर सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. या निर्णयामुळे मुंबई महानगर प्रदेशातील जवळपास ५० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणूक खर्चासाठी मोठा खर्च करावा लागत होता.

आमदार अँड आशिष शेलार यांच्या वांद्रे पश्चिम मतदारसंघातील ४०सभासद संख्या असलेल्या वांद्रे सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या  निवडणुकीसाठी, शासनाने मंजूर केलेल्या निवडणूक निरीक्षकाने १० मिनिटासाठी तब्बल २१ हजार रूपये आकारल्याची माहिती ही आमदार अँड आशिष शेलार यांनी विधानसभेत उघड केली होती.

आधीच कोरोना महामारीशी झगडत असलेल्या ५० हजार सहकारी गृहनिर्माण संस्थांना अतिरिक्त खर्चाचा बोजा आणि या निवडणूक निरीक्षकांकडून निवडणूक खर्चाच्या नावाखाली वसूल केलेल्या अन्यायकारक अवाजवी शुल्काचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हा खर्च कमी करा यासाठी पाठपुरावा करीत होते. अखेर नव्या सरकार याबाबत शासन निर्णय काढला असून सोसायट्यांचा भुर्दंड कमी केला आहे.

आता १०० सदस्यांपर्यंत ७ हजार ५०० रूपये, बिनविरोध निवडणुकीसाठी ३,५०० खर्चाची मर्यादा शासनाने निश्चित केली आहे. त्यामुळे सोसायट्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


Tags: BJPBJP MLA Adv. Ashish ShelarBJP-Shiv Sena AllianceGovernment NewsHousing Society Election Expenditure Reductionmuktpeethगृहनिर्माण सोसायटी निवडणूक खर्च कपातघडलं-बिघडलंभाजपाभाजपा आमदार अॅड. आशिष शेलारभाजपा-शिवसेना युतीमुक्तपीठसरकारी बातमी
Previous Post

मुख्यमंत्री शिंदेंना भेटल्यानंतर सोमय्यांनी ठाकरेंना माफिया म्हटलं, बंडखोर आमदारही संतापले!

Next Post

चीनी मोबाइल कंपनी ‘विवो’ची ४६५ कोटी रोख रक्कम जप्त!

Next Post
Ed Action On Chinese Company Vivo India

चीनी मोबाइल कंपनी 'विवो'ची ४६५ कोटी रोख रक्कम जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!