मुक्तपीठ टीम
मुंबईसह आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. सोमवारी रात्रीपासून सुरु झालेला पाऊस मंगळवारी दिवसभर अविश्रांत बरसला. यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. नागरिकांच्या घरातही पाणी शिरले. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज जारी केला आहे. पुढील काही दिवसांत ठाणे जिल्ह्यातही मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा आयएमडीने दिला आहे.हवामान खात्याकडून मुंबई आणि ठाण्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. येत्या पाच दिवसांत विविध ठिकाणी मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. अशात समजून घ्या रंगांनुसार अलर्ट असतो तरी काय?
रंगांनुसार अलर्ट असतो तरी काय?
खरंतर, हवामानाशी संबंधित इशाऱ्यांसाठी आयएमडीकडून चार रंगाचा कोड म्हणून वापर केला जातो. यामध्ये ऑरेंज, ग्रीन, यलो आणि रेड अशा रंगाचा वापर होतो.
ग्रीन अलर्ट
- पावसाळ्यात संबंधित शहरांमध्ये पावसाची परीस्थिती सामान्य असेल, त्यावेळी अनेक भागांमध्ये ग्रीन अलर्ट असतो.
- यावेळी कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते.
यलो अलर्ट
- हवामान खात्याकडून अनेक शहरांना यलो अलर्ट जारी केला जातो.
- यामध्ये, संबंधित शहरांमध्ये नैसर्गिक संकटाची शक्यता आहे.
- त्यामुळे सगळ्यांना सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या जातात.
ऑरेंज कलर
- मुसळधार पाऊस असेल अशा ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला जातो.
- अशा भागांमध्ये कोणत्याही क्षणी नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता असते.
- अशावेळी नागरिकांनाही गरज असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याच्या सूचना दिल्या जातात.
रेड अलर्ट
- जेव्हा एखाद्या भागात अतिमुसळधार किंवा अतिवृष्टीचा अंदाज असतो अशा वेळी रेड अलर्ट जारी करण्यात येतो.
- त्यामुळे नागरिकांनी शक्यतो घरी राहण्याच्या सूचना दिल्या जातात.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतर्क
- भारतीय हवामानशास्त्र विभागाने पुढील चार दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतर्क आले आहेत.
- त्यांनी राज्य प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना खबरदारी घेण्याचे आणि जीवित व वित्तहानी होणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश दिले.
- मुंबई शहराजवळ असलेल्या रायगड जिल्ह्यात कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने चिंता वाढली आहे.
- मुंबई आणि आजूबाजूच्या काही जिल्ह्यांमध्ये मंगळवारी सकाळी जोरदार पाऊस झाला आणि काही ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली.
जाणून घ्या कुठे कोणता अलर्ट?
- आयएमडीने दक्षिण कोकण आणि गोव्यासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
- या भागात ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे
- उत्तर कोकण, उत्तर मध्य आणि दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
- आयएमडीनुसार, मराठवाड्यात वादळ, विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस यासह ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.