मुक्तपीठ टीम
आयबीपीएसमार्फत ‘क्लर्क’ पदावर एकूण ६ हजारपेक्षा जास्त जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- कोणत्याही शाखेतील पदवी
- संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य/ भाषेत प्रमाणपत्र/ डिप्लोमा/ पदवी असणे आवश्यक आहे.
- हायस्कूल/ कॉलेज/ संस्थामधील एक विषय म्हणून संगणक/ माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ८५० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून १७५ रूपये शुल्क आकारले जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया
- सर्वात प्रथम अधिकृत वेबसाइटवर जा.
- यानंतर होम पेजवर जावून दिसणार्या क्लर्क भरती परीक्षेसाठी अप्लाय लिंकवर क्लिक करा.
- आता नोंदणी करून लॉग इन करा.
- यानंतर सर्व माहिती प्रविष्ट करा.
- आता अर्ज फी भरा आणि सबमिट करा.
- अर्ज डाऊनलोड करा आणित्याची प्रिंट आउट घ्या.
अधिक माहितीसाठी आयबीपीएसच्या अधिकृत वेबसाइट https://www.ibps.in/ वरून माहिती मिळवू शकता.