मुक्तपीठ टीम
कावासाकी हा ब्रँड प्रीमियम दर्जाच्या बाइक्ससाठी ओळखला जातो. कावासाकीने भारतात व्हर्सिस ६५० लाँच केली आहे. ही बाईक प्रीमियम सेगमेंटची बाइक असणार आहे. ही नवीन बाईक व्हर्सिस १००० सारखी दिसते. ही बाईक २ कलर ऑप्शनमध्ये लाँच करण्यात आली आहे, लाइम ग्रीन आणि मेटॅलिक फँटम सिल्व्हर या कलरचा समावेश आहे. चला या बाईकबद्दल सविस्तर जाणून घेऊया…
कावासाकी व्हर्सिस ६५० इंजिन
- या बाइकमध्ये ६४९सीसी इंजिन दिले आहे.
- हे ४ स्ट्रोक समांतर ट्विन इंजिनद्वारे समर्थित आहे.
- त्याचे इंजिन लिक्विड कूल्ड इंजिन आहे.
- त्याचे ६४९सीसी इंजिन ६६बीएचपी पॉवर आणि ६१एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते.
- कंपनीने या बाइकमध्ये ६ स्पीड गिअरबॉक्स वापरला आहे.
कावासाकी व्हर्सिस ६५० चे काही खास फिचर्स…
- या बाइकमध्ये ४.३-इंचाचा डिजिटल टीएफटी कलर इन्स्ट्रुमेंट क्लस्टर दिला आहे.
- यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीचे फीचर देखील आहे.
- कावासाकीच्या या बाईकला १७ इंचचे व्हील्स आहेत.
- यात रुंद हँडलबार, एक स्लिम टँक सारखे फीचर्स दिले आहेत.
- या बाईकमध्ये केटीआरसी फिचर्स देखील देण्यात आले आहेत.
- कंपनीने ही बाईक ७.३६ लाख रुपयांना लाँच केली आहे.
- ही बाईक भारतातील ट्रायम्फ टायगर स्पोर्ट ६६०, सुझुकी व्ही-स्ट्रोम ६५०एक्सटी आणि होंडा सीबी५००एक्स शी स्पर्धा करेल.